महाराष्ट्र

धरतरी ग्रामोन्नती सेवा संस्था विक्रमगड तर्फे भूमी (माती) पूजन कार्यक्रम संपन्न

(ठाणे प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर (मो.9028305319)
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील संगमनगर येथे धरतरी ग्रामोन्नती सेवा संस्थेने भूमी (माती) पूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते,या कार्यक्रमातसाठी पालघर जिल्ह्यातील सुमारे ४५ गावातून १२५ शेतकऱ्यांनी या माती पूजनाच्या कार्यक्रमसाठी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ओंजळभर माती आणून ती माती धरतरी मातेच्या चरणी वाहून त्या मातीचे पूजन केले.

त्यानंतर श्री.जगन्नाथ हिलीम यांनी जिल्यातील आलेल्या सर्व शेतकरी बांधवाना धरतरी, कणसरी व गावतरी यांचे महत्त्व सांगून आदिवासी समाजात पूजा पद्धतीचे महत्त्व पटवून दिले. तसेच पूजन केलेली माती पावसाळ्यात प्रत्येक व्यक्ती आपापल्या शेतात घेऊन जाऊन त्यात धाण्याची लागवड करावी असे सांगण्यात आले.

या कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष श्री.मधुकर मालकरी यांनी केली, या कार्यक्रमसाठी प्रमुख पाहुणे वकील श्री.रवींद्र वैजल , मार्गदर्शक श्री. जगन्नाथ हिलीम , वैदूभगत श्री.शंकर काकड बाबा, श्री. केशव गांगोडा व संस्थेचे कार्यकर्ते श्री. दुर्वास पवार, श्री. विजय मेघवाली, श्री.संजय पारधी, श्री. नवनाथ पाठक व सर्व ग्रामस्थ उपस्थितीत होते. कार्यक्रमाच्या शेवटी धरतरी मातेची आरती करून महाप्रसादाने हा कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button