महाराष्ट्र

जिल्हा नियोजन मंडळातून उजनी जलाशयामध्ये मत्स्य बोटुकली संचयन करण्यासाठी ५० लक्ष…दुर्गसंवर्धन साठी २ कोटी…आरोग्य उपकेंद्र विकासासाठी १ कोटी ३० लक्ष व पशुसंवर्धन व शेतकरी अभ्यासिकेसाठी ५० लक्ष निधी मंजूर…आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीमधून पालकमंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेनुसार उजनी जलाशयामध्ये मत्स्य बोटुकली संचयन करणे या कामासाठी ५० लक्ष निधी मंजूर झाला असून प्राथमिक आरोग्य केंद्र /उपकेंद्र बांधकाम ,विस्तारीकरण, केंद्र व उपकेंद्राची देखभाल व दुरुस्ती ,अग्नि सुरक्षा यंत्रणा खरेदी तसेच देखभाल दुरुस्ती, रुग्णालयाच्या इमारतीचे लेखापरीक्षण करणे, विद्युत जोडणीचे लेखापरीक्षण करणे या मुख्य लेखाशीर्ष अंतर्गत करमाळा तालुक्यासाठी आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राच्या केंद्रासाठी १ कोटी ३० लक्ष निधी, दुर्ग संवर्धन साठी २ कोटी, शेतकरी अभ्यासिका व पशुसंवर्धन साठी ५० लक्ष निधी असा एकूण ४ कोटी ३० लक्ष निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, पाडळी, गुळसडी, वडशिवणे येथील नवीन आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम पूर्ण झाले असून तिथे विद्युतीकरण करणे यासाठी प्रत्येकी ३ लक्ष निधी ,साडे येथील आरोग्य केंद्र मुख्य इमारत गळती बंद करणे, नवीन गेट बसविणे व कर्मचारी निवासस्थान मधील ड्रेनेज व शौचालय दुरुस्ती काम करणे यासाठी ७ लक्ष निधी, पोटेगाव येथील डिलिव्हरी रूम तसेच शौचालय दुरुस्ती यासाठी ५ लक्ष निधी, पांगरे येथील डिलिव्हरी रूमचे दरवाजे, खिडक्या नवीन बसविणे ,पाणीपुरवठा बोअर घेणे ४ लक्ष निधी,कंदर डिलिव्हरी रूमचे दरवाजे, खिडक्या नवीन बसविणे ,

पाणीपुरवठा बोअर घेणे ४ लक्ष निधी, घोटी येथील डिलिव्हरी रूमसाठी ४ लक्ष निधी,राजूरी येथील आरोग्य उपकेंद्र संरक्षक भिंत बांधणे १० लक्ष , हिवरे रूम छत गळती शौचालय दुरुस्ती, पाण्याची सोय व नळ फिटिंग ४ लक्ष, भोसरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र निवासस्थान फरशी बसवणे व लसीकरणासाठी स्वतंत्र बांधणे १० लक्ष निधी, कुर्डू येथे संरक्षक भिंत बांधणे व शौचालय दुरुस्ती १० लक्ष निधी, म्हैसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत रस्ता कॉंक्रीकरण करणे व संरक्षण भिंत बांधणे,६३ लक्ष निधी असा आरोग्य विभागासाठी निधी मंजूर झाला आहे. तसेच पशुसंवर्धन विभागासाठी २५ लक्ष व शेतकरी अभ्यासिका बांधण्यासाठी २५ लक्ष, दुर्ग संवर्धन साठी २ कोटी असा एकूण ४ कोटी ३० लक्ष निधी मंजूर झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button