महाराष्ट्र

सोलापूर शहर बागवान जमीयत सिटी ट्रस्ट “यंग ब्रिगेड” ची स्थापना करणार.. सल्लागार समिती सदस्य उमरभाई मर्चंट (M राऊंड)

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि,टाईम्स 9 न्यूज नेटवर्क,अकलूज

1956 साली सोलापुरातील तत्कालीन बुजुर्ग मंडळींपैकी एक असलेले बागवान समाजाचे “बावालाल वकील” यांनी सोलापूर शहर बागवान जमियत सिटी ट्रस्ट ची स्थापना करून एक आदर्शवत सामाजिक संस्था कशी असते आणि त्या संस्थेचा समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत कसा फायदा होईल हे सबंध सोलापूर शहरासह अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिले…

आजच्या घडीला सोलापूर शहर बागवान जमियत सिटी ट्रस्ट हि महाराष्ट्रातल्या तमाम शहरांची एक “आयडीयल” समाज सेवा संस्था असून,गेली 75 वर्षे हि संस्था महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरातील बागवान समाजासाठी “रहेबरी” चे काम करत आहे…

दरम्यानच्या काळात सोलापूर शहर बागवान जमियत साठी अ अजीज चाचा,हाजी फजले अहमद अडते,नूरअहमद साब खलिफा,हाजी मौलाली बागवान,हाजी अ गणी कोंडाजी बागवान,हाजी दाऊद साब बागवान,हाजी रसुल साब कामतीकर,हाजी इमामसाब दलाल,हाजी छोटूभाई बागवान,हाजी अतिकुर्रहमान बागवान,अकबरभाई बागवान,हाजी म हनिफ (शेठ) कल्याणी यांच्या सह हाजी सिकंदर (शेठ) कामतीकर यांनी जमियत चे काम हे कायम लोकांच्या स्मरणात राहील असे मोलाचे योगदान देत हि संस्था अक्षरशः जिवंत ठेवली…

गेल्या वर्षी सोलापूर शहर बागवान जमियत सिटी ट्रस्ट ने प्रथमच ऍड रफिक बागवान,हाजी नशीरअहमद खलिफा,हाजी मुखत्यार (नाना) हुमनाबादकर, राजा बागवान (सर),इम्तियाज मर्चंट,इक्बाल (मामु) दलाल,हाजी जीलानी कल्याणी,हाजी मौलाबक्ष तुलजापूरे,हाजी बिलाल शेठ बागवान (बटाटे वाले) या नऊ (9) जणांच्या “लवाद समिती” ची स्थापना केली होती,परंतु हाजी बिलाल शेठ बागवान (बटाटे वाले) यांचे निधन झाल्याने उर्वरित लवाद समिती सदस्यांनी एकवीस (21) संचालकांच्या कमिटीतूनअध्यक्ष डॉ महेबुब दलाल (सर)उपाध्यक्ष :- हाजी अल्ताफ हाजी शुकुर लिंबूवाले,आणि हाजी मुश्ताक हाजी सरदार चौधरी सेक्रेटरी :- हाजी अखलाक हाजी मो उस्मान मर्चंट सह सेक्रेटरी :- हाजी फैय्याज हाजी अकबरभाई बागवान खजिनदार :- हाजी इम्तियाज हाजी इस्माईल दलाल यांची नेमणूक करून एक नवा आदर्श निर्माण केला आणि याच “लवाद समिति” ने आज बागवान समाजातील युवकांना काम करण्याची संधी म्हणून “यंग ब्रिगेड” सल्लागार समिति स्थापन करण्यात आली ती पुढील प्रमाणे…

नसिमभाई खलिफा
रियाज अकबर बागवान
हाजी इब्राहिम मैंदगीॅकर
उमरभाई बागवान (M राऊंड)
गुलाबभाई बागवान
अफजलभाई सौदागर
खालिद वकील
जमिर रामपुरे
आरिफ बागवान (बाॅस)
*एजाज बागवान

उपरोक्त माहिती नुसार असे जाहीर आवाहन करण्यात आले की ज्या युवकांना समाजासाठी काही काम करायचे असल्यास त्या युवकांनी सोलापूर शहर बागवान जमीयत च्या जोडभावी पेठ येथील कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेऊन त्या अर्जात आपली वैयक्तिक माहिती भरून हे अर्ज 11,12 आणि 13 फेब्रुवारी पर्यंत कार्यालयात जमा करावे…

संबंधित अर्जा साठी ओवेज बागवान (8149848386) यांना संपर्क करावा,असे आवाहन सल्लागार समिती चे रियाज बागवान आणि उमरभाई मर्चंट (M राऊंड) यांनी केले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button