विशेष

उन्हाळ्यात शेतीच्या पंपासाठी महावितरणने आठ तास वीज पुरवठा करण्याच्या निर्णयाचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केले स्वागत

करमाळा प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

उन्हाळ्यात शेती पंपासाठी आठ तास वीजपुरवठा करण्याच्या महावितरणच्या निर्णयाचे माजी आमदार नारायण पाटील यांनी स्वागत केले आहे. याबाबत सविस्तपणे बोलताना पाटील यांनी सांगितले की सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या मागील बैठकीत आपण शेती पंपाच्या वीज पुरवठ्याच्या बाबत प्रश्न उपस्थित केला होता. उजनी धरणातील उपयुक्त पाणी साठा कमी झाल्याने आणि पाणी पातळी मायनस मध्ये गेल्याने मार्च ते जून या दरम्यान उजनीचे पाणी राखून ठेवण्याच्या नावाखाली धरणकाठचा शेतीपंपचा वीजपुरवठा खंडित केला जातो हा मागील अनुभव असल्याचे आपण त्या बैठकीत सांगितले. तसेच उजनी काठच्या व सिना भीमा बोगदा परिसरातील भागात मोठ्या प्रमाणात केळी आणि ऊस या नगदी पिकांच्या लागवडीचे क्षेत्र आहे. यामुळे या भागाला पुढील पावसाळा होई पर्यंत शेती पंपासाठी मुबलक वीज मिळणे गरजेचे आहे अन्यथा करोडो रुपयांची ही पिके वाया जाऊ शकतात अथवा या पिकांच्या थेट उत्पादनावर याचा गंभीर परिणाम होऊन सरासरी उत्पन्नात घट होते. ही बाब आपण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शास आणून दिली. या बाबत एक लेखी निवेदन सादर केले. यामुळे आपल्या या या मागणीचा महावितरण कडून गंभीरतेने विचार केला गेला आणि सकारात्मक प्रतिसाद सुध्दा दिला गेला. संपूर्ण उन्हाळ्यात शेती पंपासाठी आठ तास वीज पुरवठा करण्याच्या या निर्णयाचे आपण स्वागत करत असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करत असल्याचेही माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. तर माजी आमदार नारायण पाटील यांनी सातत्याने उजनी काठच्या अगदी कंदर ते कोंढारचिंचोली पर्यंतच्या पट्ट्यातील शेतकरी आणि धरणग्रस्त यांच्या हक्क व प्रश्न याबाबत पुढाकार घेऊन भूमिका मांडण्याचे काम केले. सत्तेत असो वा नसो शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. खास करून शेतीसाठी वीज प्रश्नावर वेळ प्रसंगी आंदोलने केली. यंदा माजी आमदार नारायण पाटील यांनी दाखवलेली सतर्कता आणि पाठपुरावा यामुळे शेतकऱ्यांवरील शेती पंपाच्या वीज कपातीचे आगामी संकट टळले असून उजनी परिसरातील शेतकऱ्यांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button