मुस्लिम समाजातील सर्व घटकांसाठी काम करणार… उमरभाई मर्चंट (M राऊंड)
प्रतिनिधी अमीर मोहोळकर टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
सोलापूर शहर बागवान जमियत सिटी ट्रस्ट भविष्यात मुस्लिम समाजातील सर्वच घटकांसाठी काम करत राहील असे वक्तव्य सल्लागार समिती चे रियाज बागवान आणि उमरभाई (M राऊंड) यांनी केले,पुढे बोलताना ते असे हि म्हणाले की लवकरच आम्हीं सिटी ट्रस्ट च्या अंतर्गत “बागवान युवक संघटना” ची घोषणा करणार आहोत,ते टाईम्स 9 न्यूज नेटवर्क चे अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांच्याशी भ्रमणध्वनी वर बोलत होते…
काल जोडभावी पेठ येथील जमियत च्या कार्यालयात आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते,या वेळी 241 रुग्णाच्या डोळ्यांची,63 रुग्णाच्या दातांची तर 139 रुग्णाच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली,या वेळी डॉ पटेल,डॉ मोहसीन दलाल,डॉ नासीर सय्यद,डॉ मौलवी यांनी आलेल्या सर्व रुग्णाची तपासणी करून पुढील उपचारासाठी योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन केले…
सदर आरोग्य शिबिरासाठी जमियत चे अध्यक्ष डॉ मन्सूर दलाल,हाजी मुश्ताकभाई मर्चंट (Mराऊंड),हाजी अल्ताफ लिंबुवाले,हाजी मुश्ताक चौधरी,हाजी अखलाक मर्चंट,हाजी फय्याज बागवान,हाजी इम्तियाज दलाल,रईसभाई (नाफे),हाजी मतीन बागवान,हाजी मुश्ताक अहमद खलीफा,हाजी मंजूर (मामा),मुश्ताक अहमद इंजिनियर,डॉ हारून रशीद,इफ्तेकारअहमद तुळजापुरे (MMT),नाझीम कामतीकर, अशपाक मेंबर,एजाज (अण्णा) बागवान (सुतमिल),ऍड आमीर बागवान,हाजी दाऊद बागवान,हाफीज अ रज्जाक चौधरी,हाफीज सलाम बागवान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले…
यावेळी हाजी मुखत्यार (नाना),हाजी मौलाबक्ष तुळजापूरे,माजी नगरसेवक नसीम खलिफा,इब्राहिम मैंदर्गिकर,झहीर कामतिकर,इम्रान (MMM),मोहसीन मैंदर्गिकर,जमीर रामपूरे,शफीक तुळजापूरे यांची प्रमुख उपस्थित होती…
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जमियत च्या “मेडिकल कमिटी” च्यां सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले…