केडगाव येथील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी केला माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात केला प्रवेश.

करमाळा प्रतिनिधी अलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
केडगाव येथील आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार नारायण (आबा ) पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट ) मध्ये जाहीर प्रवेश केला. उजनी पट्ट्यातील केडगाव हे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. यामुळे या गावातील महत्वाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी मिळाली आहे. यावेळी सचिन कैलास बोराडे (माजी सरपंच),शिवाजी बोराडे (मा. उपसरपंच), उत्तम दगडू साळुंखे (विद्यमान ग्रामपंचायत सदस्य), वैभव बोराडे (सामाजिक कार्यकर्ता), संतोष मस्तुद ( मा. ग्रामपंचायत सदस्य), नितीन डोके, देविदास फडतरे, सागर बोराडे, आप्पा बोराडे, गंगाराम शिनगारे, अरुण बोराडे, तुकाराम पाटील (मा. ग्रा. प. सदस्य), गणेश गुटाळ (मा. उपसरपंच), सतिश बोराडे, शिवाजी बोराडे, समाधान शिनगारे, पांडुरंग फडतरे, दशरथ बोराडे, प्रवीण खोलासे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या पक्षात मा. आ. नारायण(आबा) पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला.

या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत आणि सत्कार समारंभ जेऊर येथील माजी आमदार कार्यालयात पार पडला. यावेळी आदिनाथचे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, सभापती अतुलभाऊ पाटील, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज(भैय्या )पाटील,ग्रामपंचायत सदस्य संदीप कोठारी, माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड, कैलास बोन्द्रे, तालुका आरोग्य समितीचे माजी सदस्य ऍड. विजय कोकरे,लोकनेते नारायण (आबा) पाटील मित्र मंडळ शाखा केडगाव अध्यक्ष पोपट राव लगस, हनुमंत भगत, मंगेश बोन्द्रे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद गरड यांनी केले. यावेळी सचिन बोराडे व नितीन डोळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले. सोशल मीडिया तालुकाप्रमुख संजय फडतरे यांनी आभार मानले.



