शहर

अकलूज नगर परिषद करणार “वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून” मुस्लिम दफन भुमीचे सुशोभीकरण…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज,अकलूज
9890299499

समस्त मुस्लिम समाज अकलूज शहर यांच्या वतीने अकलूज येथील शाही कब्रस्तान गट क्रमांक आणि सर्वे क्रमांक 53 या जागेत खालील कामासंदर्भात विकास कामे करण्याचे दिनांक 25/7/2024 गुरुवार रोजी अकलूज नगर परिषदेच्या “वैशिष्ट्यपूर्ण विकास योजने” तून होण्याबाबत सर्वानुमते ठराव करण्यात आला.

  ठराव खालील प्रमाणे

१) आशुरखाना व वजूखाना (लघु शौचालय)

२) पूर्वेकडील ओढ्यालगत व उत्तरेकडील संरक्षण भिंत बांधणे

३) अंतर्गत सिमेंट रस्ते व वृक्षारोपण झाडे दिवाबत्तीची सोय करणे

४) मुस्लिम स्मशानभूमीचे सुशोभीकरण करणे याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला…

सदर बैठक ही अकलूज येथील मुस्लिम कब्रस्तान येथे घेण्यात आली. या बैठकी मध्ये “वैशिष्ट्यपूर्ण विकास योजना” निधीचा वापर अकलूज शहर मुस्लिम कब्रस्तान मध्ये कशा प्रकारे करायचा व सुशोभीकरण कसे याचे नियोजन व कब्रस्तान ची नवीन कोअर कमिटी लवकरच बनविण्याचा निर्धार कऱण्यात आला.

सदर बैठक युसुफ साहेबलाल शेख,हाजी दादाभाई हाजी इब्राहिम बागवान (मोहोळकर),मुक्तार कोरबु,लालखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली,यावेळी समस्त अकलूज शहर मुस्लिम समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button