महाराष्ट्र

विशाळगड,गजापुर येथील नुकसानग्रस्तांना माळशिरस तालुका मुस्लिम समाज आणि मुस्लिम समन्वय समिती म राज्याच्या वतीने अन्नधान्याचे किट वाटप…रशीद शेख

आमीर मोहोळकर प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज 9890299499

१४/०७/२०२४ रोजी झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड येथील हजरत मलिक रहमान बाबा दर्गा परिसर अतिक्रमण प्रकरणामुळे गजापूर येथे झालेल्या मुस्लिम  बांधवावरील हल्ल्यात येथील मुस्लिम समाजातील बांधवांच्या मालमत्तेचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते,तेथील मुस्लिम समाज हा दहशतीच्या छायेखाली असताना एक सामाजिक बांधिलकी जोपासत माळशिरस तालुक्यातील समस्त मुस्लिम समाज आणि मुस्लिम समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने विशालगड व गजापुर येथे अन्नधान्याचे किट मदत देत संबंधित मुस्लिम समाजातील बांधवांना धीर देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी मुस्लिम समन्वय समिती चे प्रदेश अध्यक्ष रशिद भाई शेख,संपर्क प्रमुख शाहबाझ शेख,मिडिया प्रमुख सलमान शेख,फिरोजरजा तंबोली,मुबारक तंबोली,मुजफ्फर सय्यद,अशरफ मुल्ला,मुख्तार तंबोली,अंसार तांबोळी

माळशिरस तालुक्यातील समस्त मुस्लिम समाजा तर्फे अन्नधान्याचे किट वाटप करते वेळीमोहम्मद युसुफ मोहम्मद अंसारी,हजरत ख्वाजा गरीब नवाज महाराष्ट्र कमिटीचे महासचिव आणि त्यांचे सर्व पदाधिकारी तसेच अकोला येथील हाफिज नजीर यांच्यासह हजरत सय्यद मलिक रेहान बाबा विशाळगड,गजापुर चे सर्व ट्रस्टी आणि ग्रामस्थ उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button