शहर

पूर्व राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मत्स्यउद्योग विकास धोरण समितीची बैठक संपन्न

टाईम्स9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640

उत्तर प्रदेश पूर्व राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व सुधीर मुनगंटीवार मंत्री वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय यांच्या उपस्थितीत मंगळवार 23 जुलै 2024 रोजी सह्याद्री अतिथी गृहात मत्स्योद्योग विकास धोरण समितीची बैठक पार पडली.

यावेळी बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी पालघर जिल्ह्यातील मच्छिमारांचे व मत्स्यशेती करणा-यांचे प्रश्न प्रामुख्याने मांडून त्यांच्या वर्षोनुवर्षांच्या समस्यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या बैठकीत मांडला व मच्छिमार बांधवांना निधी, सोयीसुविधा पुरवताना ईतर जिल्ह्यापेक्षा पालघर जिल्ह्याबाबत दुजाभाव करत नेहमी कमी लेखले जाते याकडे आमदार राजेश पाटील यांनी मंत्री महोदयांचे लक्ष वेधले. तसेच पालघर जिल्ह्यातील मासेमारी करणारी काही बंदरे ही किनाऱ्यावर साचणा-या गाळ समस्येमुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. पालघर तालुक्यातील दातिवरे हे गाव बोटी किनाऱ्यावर नांगरण्यात येणाऱ्या अडचणीमुळे कायमचे बंद झाले आहे. जिथे 50 ते 60 मोठ्या नौका वावरत होत्या व तेथिल उपजिविका त्यावर चालत असे. आज ते नामशेष झाले आहे. अशावेळी त्वरित निधी उपलब्ध करून सातपाटी, मुरबे दातिवरे येथिल बंदराचा गाळ काढण्यात यावा अशी मागणी केली .

तसेच अवकाळी पावसामुळे यावर्षीही मच्छिमारांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. सुकत घातलेले मासे अवकाळी पावसामुळे खराब झाल्याने जे नुकसान झालेले आहे त्याची नुकसान भरपाई व अनुदान स्वरुपात देऊन मच्छिमारांना थोडा दिलासा द्यावा अशी मागणीही करण्यात आली. त्याचबरोबर लवकरच पालघर सातपाटी येथे आधुनिक घाऊक बाजार केंद्र मच्छिमारांना उपलब्ध व्हावे तसेच तालुका व गावपातळीवर अद्ययावत किरकोळ बाजार शेड किंवा केंद्र बनविण्यासाठी आपल्या खात्याकडून अग्रक्रम देण्यात यावी अशी मागणी केली.

जेटीवरील प्रवासी शेड, शौचालय या मुलभूत सोयी सुविधांबरोबरच, मासे सुचविण्यासाठी चौथारे, जाळी शिवण्यासाठी शेड यासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्यात यावा व त्वरित त्याचे काम हाती घ्यावे अशी सूचना आमदार राजेश पाटील यांनी केली. तसेच धुप प्रतिबंध बांधारेंची कामे बरेच वर्षापासून रखडलेली आहेत ती त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणीही केली.

पालघर जिल्ह्यात मस्त्य शेती करणारे व मिठागरे जोपासणारा वर्गही मोठा आहे. त्यांच्या जागा खालसा करण्याचा विचार शासनदरबारी होत आहे. तेव्हा त्यांचे ऊपजिविकेचे साधन काढून न घेता त्यांच्या भाडेकरारात वाढ करावी किंवा गरज पडल्यास त्यांच्या नावे कायम करून त्यांना अर्थसहाय्य करून त्यांना यशस्वी उद्योजक बनण्यास मदत करावी. विशेषततः खारेकुरण व इतर मच्छिमार संस्था कोळंबी संवर्धन वर्षानुवर्षे करत आहेत त्यांच्या भाडेकरार संपत आला असताना त्यांना भाडेकरार वाढवून देत अशा संस्थांच्या उन्नती आणि विकासासाठी शासनाने प्रथम प्राधान्य द्यावे अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी केली. यावेळी मंत्री महोदय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जातीने लक्ष घालत त्वरित उपाययोजना करून ते मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. यावेळी मा ऊद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दिपक केसरकर आणि सहकारी आमदार महोदय उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button