महाराष्ट्र

आमदार बबनराव शिंदे यांच नेतृत्व “सक्षम” राहिलेलं दिसत नाहीय…

माढा तालुक्याचा भविष्यातील “आश्वासक” चेहरा शिवतेजसिंह मोहिते पाटील…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

“24 ची लोकसभा निवडणुक खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात गाजवली ती म्हणजे माढा लोकसभा मतदार संघाने,देशाचे नेते शरद पवार साहेब आणि “अजातशत्रू” विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांनी नेतृत्व केलेल्या माढा ची सत्ता भाजपा कडून जवळ जवळ सव्वा लाख मतांच्या फरकाने काबीज करत फुले,शाहु,आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा पगडा कायम राखला तो धैर्यशील मोहिते पाटील यांनी…

लोकसभेचा निकाल लागून हि आता दोन महिने होत आले आहेत,महाराष्ट्रातील नेते मंडळींना आणि तमाम जनतेला वेध लागलेत ते महाराष्ट्र विधान सभा निवडणुकीचे…प्रत्येक गावात,वाड्या वस्त्यावर,चौका चौकात,पारावर,कट्टयावर चर्चा सुरू आहे ती विधानसभा निवडणुकीचीच…

माढा लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील यांचं नेटकं नियोजन तसेच राजकारणातील त्यांची “अचूकता” आणि जनतेची मिळालेली सहानुभूतीच्या जोरावर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गळ्यात “विजयश्री” ची माळ घालून गेली…

एकंदरीत पणे आपण सर्वांनी आजच्या घडीला सहजासहजी जरी विचार केला तर माढा लोकसभा मतदार संघातील माढा विधान सभा मतदार संघाचे आमदार बबनराव शिंदे यांचं नेतृत्व आता “सक्षम” राहिलेलं नाहीय कारण माढा आणि करमाळा तालुक्यातुन भाजपा च्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दोन लाखाचे लीड देतो म्हणणारे आमदार बबनराव शिंदे आता फार खचले गेले असल्याने त्यांच्या नेतृत्त्वात तो “सक्षम” पणा राहिला नसल्याने तसेच पुरोगामी विचारांना फाटा देत अजित दादा पवार यांच्या सह “महायुती” मध्ये गेल्याने तालुक्यातील जनता हि त्यांच्यावर नाराज असल्याने शिंदे परिवार सध्या राजकारणात कुठे आहे…? असा प्रश्न जनताच एकमेकांना विचारत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे…

याच्या उलट संसदेत शपथ विधी पार पाडत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या संपर्क कार्यालयात जनता दरबार भरवून खासदारकीचा “श्री गणेशा” मोठ्या दिमाखात साजरा करत आहेत,जनता दरबार मध्ये आलेल्या हजारों लोकांचे प्रश्न ऐकून घेत ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न धैर्यशील मोहिते पाटील करत असल्याचे दिसत आहे…

या दरम्यान लोकसभा निवडणुकीत माढा तालुक्याची जबाबदारी इमाने इतबारे पार पाडणारे युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचं नेतृत्व हि माढा तालुक्यात जोर धरू लागल्याने सबंध सोलापूर जिल्ह्यात तो चर्चेचा विषय ठरत असुन माढा तालुक्यात शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे ठिक ठिकाणी लागलेले होर्डिंग्ज वर “भावी आमदार” म्हणून केलेला उल्लेख लक्ष वेधून घेत आहेत…

नव निर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या जनता दरबारात माढा तालुक्यातील नाराज जनतेची हजेरी लक्षवेधी मानली जात आहे म्हणूनच आमदार बबनराव शिंदे सारखं तीस वर्षे एक हाती सत्ता भोगलेल नेतृत्व सध्या तरी “सक्षम” राहिले आहे असे वाटत नाहीय…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button