शहर

रिपब्लिकन सेनेची अकलूज येथे आढावा बैठक संपन्न; सोलापूर-माढा क्षेत्रातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

अकलूज (प्रतिनिधी)
रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर आणि राष्ट्रीय युवा नेते ॲड. अमन आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील सोलापूर-माढा लोकसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक नुकतीच अकलूज येथे उत्साहात पार पडली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव सोमनाथ अरुण भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत प्रदेश सचिव सोमनाथ भोसले यांच्या हस्ते सोलापूर-माढा लोकसभा मतदारसंघासह माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. तसेच, निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेश सचिव सोमनाथ भोसले म्हणाले की, “मागील काळात काही पदाधिकाऱ्यांनी अपेक्षित काम न केल्यामुळे पक्षाच्या बळकटीकरणासाठी काही पदांवर खांदेपालट करून नव्या, कार्यक्षम चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करावा. तसेच सरसेनानी आनंदराज आंबेडकर आणि ॲड. अमन आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून पक्षसंघटना अधिक मजबूत करावी.”

नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे
सोलापूर-माढा लोकसभा:जिल्हाध्यक्ष: विश्वास उगाडे
महिला आघाडी जिल्हाध्यक्षा: नीलम बनसोडे
माळशिरस तालुका: तालुकाध्यक्ष: विकी लोंढे
युवक तालुकाध्यक्ष: शिवाजी खडतरे
तालुका संघटक: दत्ता कांबळे
युवक संपर्कप्रमुख: शिवाजी गेजगे
महिला आघाडी तालुकाध्यक्षा: पुष्पाताई भडंगे
पंढरपूर तालुका:तालुकाध्यक्ष: गणेश गायकवाड
अकलूज शहर:शहराध्यक्ष: साजिद बागवान
शहर उपाध्यक्ष: शहाजी खडतरे

आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विश्वास उगाडे यांनी, प्रदेश सचिव सोमनाथ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर-माढा लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यात पक्षाची ताकद वाढवून संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या महत्त्वपूर्ण बैठकीस परिसरातील पदाधिकारी आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button