शहर

ससाणे DP रत्नपुरी १८ मधील रस्त्यावरील प्रलंबित ‘डीपी’ हटवण्यास अखेर मंजुरी!खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; संग्रामनगरवासीयांना दिलासा

अकलूज / संग्रामनगर (प्रतिनिधी) सोमनाथ पवार
संग्रामनगर परिसरातील ससाणे DP रत्नपुरी १८ येथील मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विद्युत डीपी (Transformer) शिफ्टिंगच्या कामास अखेर महावितरण प्रशासनाकडून मंजुरी मिळाली आहे. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या या धोकादायक डीपीमुळे परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.

खासदार धैर्यशील (भैय्या) मोहिते-पाटील आणि अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील यांनी या समस्येची गंभीर दखल घेत महावितरण प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आल्याने संग्रामनगर आणि ससाणे DP परिसरातील नागरिकांमधून समाधानाची लाट पसरली आहे.

नागरिकांना मिळणारे मुख्य फायदे
रस्त्याच्या मधोमध असलेला ट्रान्सफॉर्मर बाजूला झाल्याने रस्ता मोकळा होऊन वाहतूक कोंडी टळेल.
ऐन रहदारीच्या ठिकाणी असलेल्या या डीपीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता, तो आता पूर्णपणे टळणार आहे.
परिसरातील रहिवासी आणि व्यापाऱ्यांना दळणवळणासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध होईल.

वर्षानुवर्षे रखडलेला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निकाली निघाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सचिन लोखंडे, हंसराज घुले आणि सुभाष थिटे यांच्यासह संग्रामनगर परिसरातील नागरिकांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील, महावितरणचे संबंधित अधिकारी व प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button