पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील कोरे एयरपोर्ट, एसार टेक्सटाईल पार्क आणि वाढवण बंदर या विरोधात तिरंगा रॅली…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील दातिवरे – कोरे विमानतळ, एसार (MIDC), टेक्स्टाइल पार्क आणि या सर्व प्रकल्पांचे मूळ असलेल्या वाढवण बंदराच्या विरोधात पंचक्रोशीतील संपूर्ण गावकऱ्यांच्या ग्रामस्थांनी तिरंगा बाईक रॅली काढून जनजागृती करून विरोध नोंदविला. प्रस्तिवित दातिवरे – कोरे विमानतळ, एसार (MIDC), टेक्स्टाइल पार्क असे येऊ घातलेल्या प्रकल्पांमुळे संपूर्ण गावात भितीचे वातावरण असून हिच भीती नष्ट करण्यासाठी आणि एकोप्याचे दर्शन घडवून आणण्यासाठी ही तिरंगा रॅली काढण्यात आली असल्याचे सांगण्यात येते आहे.
हजारोंच्या संख्येने शेकडो बाईक स्वार या रॅली मधे सहभागी झाले. एकच जिद्द दातिवरे – कोरे विमानतळ, एसार (MIDC), टेक्स्टाइल पार्क आणि वाढवण बंदर रद्द अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

दातिवरे, कोरे, एडवण, मथाणे, भादवे, उसरणी, चटाळे, मधुकर नगर, दांडा-खटाळी, केळवे, आगरवाडी, सफाळे अशा पंचक्रोशीतील नागरिकांनी या तिरंगा बाईक रॅली मधे सहभाग नोंदविला. या रॅलीचे आयोजन पंचक्रोशीतील विविध गावातील तरुण तरुणींमार्फत करण्यात आले.
पुढे संपूर्ण पंचक्रोशीतील गावागावात जाऊन सदरील दातिवरे – कोरे विमानतळ आणि एसार (MIDC) बाबतील जनजागृती करून गावातील लोकांना विश्वासात घेऊन मोठं आंदोलन उभं करण्याचा निर्धार करून रॅलीची सांगता करण्यात आली.



