सफाळे विराथन बुद्रुक येथे आगरी सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन… राजाराम साळवी यांच्या हस्ते…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640
पालघर जिल्ह्यातील विराथन बुद्रुक सफाळे येथे आगरी सेना मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक 30 मे रोजी आगरी सेना संस्थापक आणि प्रमुख राजाराम साळवी यांच्या शुभ हस्ते पार पडला.
यावेळी या कार्यक्रमाला आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील, आगरी सेना प्रमुख नेते प्रदीप साळवी, आगरी सेना महाराष्ट्र महिला अध्यक्ष मनीषा पाटील, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चंदूलाल घरत, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस गजानन भोईर, महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख मनोज साळवी, तसेच स्थानिक पदाधिकारी चेतन गावड, प्रदीप घरत, शशिकांत घरत,प्रणय पाटील, योगेश घरत तसेच कार्यकर्ते व या भागातील ग्रामस्थ यांच्यासह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी आगरी सेना प्रमुख संस्थापक राजाराम साळवी यांनी बोलताना सांगितले की आगरी अन्याय करणार नाही आणि अन्याय तर सहन कधीच करणार नाही म्हणूनच या समाजाला एकत्र आणण्यासाठी 1 ऑगस्ट 1986 रोजी आगरी सेनेची स्थापना करून गेल्या 39 वर्षापासून भूमिपुत्रांच्या नाय हक्कासाठी व विविध सामाजिक प्रश्नावर आगरी सेना काम करत असून आज या आगरी सेनेने पालघर रायगड पनवेल मुंबई या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या सर्वांचे श्रेय त्यांनी आगरी सेनेच्या कार्यकर्त्यांना दिले व आग्र्यांनी संघटित होऊन प्रगतीच्या वाटा शोधा आणि जगावर धावा असा मूल मंत्र उपस्थित आगरी समाजातील बांधवांना दिला
यावेळी या कार्यक्रमात आगरी समाजातील डॉक्टर अरुण घरत, डॉक्टर चंदन घरत, डॉक्टर तेजल किणी यांच्यासह 20 डॉक्टरांचा तसेच ॲडव्होकेट कांचन भोईर, ॲडव्होकेट हेमंत घरत, ॲडव्होकेट आकांक्षा भोईर अशा 15 आगरी वकिलांसह पत्रकार विजय घरत आणि लेखक साहित्यिक यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता म्हात्रे, आणि महेंद्र पाटील यांनी केले



