शहर

अकलूजमधील हायव्होल्टेज ड्रामा: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही अतिक्रमण ‘जैसे थे’; प्रशासकीय प्रतिष्ठेची कसोटी!​नोटीसची १५ दिवसांची मुदत संपली; अतिक्रमणधारकांवर गुन्हे दाखल होणार का? संपूर्ण माळशिरस तालुक्याचे लक्ष

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network

​अकलूज:अकलूज नगरपरिषद हद्दीतील अत्यंत मोक्याच्या सरकारी जागा (सिटी सर्वे नंबर १८३४ आणि १८३५) वरील अतिक्रमणाचा मुद्दा आता कमालीचा तापला आहे. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन १५ दिवस उलटून गेले, तरीही संबंधित अतिक्रमणधारकांनी आपली अतिक्रमणे हटवलेली नाहीत. त्यामुळे, कायद्याची अवहेलना करणाऱ्या या संबंधितांवर आता प्रशासन गुन्हे दाखल करणार का? याकडे संपूर्ण माळशिरस तालुक्याचे लक्ष लागले आहे.

​🛑 जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला
​काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या गंभीर प्रकरणाची दखल घेतली होती. त्यांनी उपविभागीय अधिकारी (प्रांत) अकलूज, मुख्याधिकारी अकलूज नगरपरिषद आणि तहसीलदार माळशिरस यांची एक तातडीची संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीत सदर सरकारी जागेवरील अतिक्रमण तातडीने निष्कासित करण्याचे कडक आदेश देण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या थेट भूमिकेमुळे या कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, स्थानिक प्रशासनाची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे.

​📜 नोटीस देऊनही ‘जैसे थे’ परिस्थिती; राजकीय पाठबळाची चर्चा
​जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, स्थानिक प्रशासनाने १५ मे २०२६ रोजी संयुक्त नोटीस बजावून संबंधित तिन्ही अतिक्रमणधारकांना स्वतःहून मुदतीत अतिक्रमण काढून घेण्याचे बजावले होते. मात्र, नोटीस देऊन १५ दिवस उजाडले, तरीही अतिक्रमणधारकांनी जागेवरून तसूभरही अतिक्रमण हटवलेले नाही. प्रशासकीय आदेशाला थेट केराची टोपली दाखवण्याच्या या प्रकारामुळे अकलूजकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. “या अतिक्रमणधारकांना नक्की कोणाचे राजकीय पाठबळ आहे?” अशी चर्चा आता चौकाचौकात रंगू लागली आहे.

​⚠️ ‘सामाजिक कल्याण संघा’चे प्रशासनाला स्मरणपत्र; तीव्र आंदोलनाचा इशारा
​या संपूर्ण प्रकरणात ‘सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघा’चे पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. नोटिसीची कायदेशीर मुदत संपल्याचे प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी त्यांनी उपविभागीय अधिकारी अकलूज, मुख्याधिकारी अकलूज नगरपरिषद आणि तहसीलदार माळशिरस या तिन्ही जबाबदार अधिकाऱ्यांना ‘स्मरणपत्र’ (Reminding Letter) दिले आहे. तसेच या स्मरणपत्राची प्रत माहितीसाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांनाही रवाना करण्यात आली आहे.
​”सरकारी जागेवर अतिक्रमण करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासन पाठीशी घालणार की कडक कारवाई करणार? मुदत संपूनही अतिक्रमण न हटवणे हा थेट प्रशासनाचा आणि कायद्याचा अवमान आहे. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ बळाचा वापर करून हे अतिक्रमण हटवावे आणि गुन्हे दाखल करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
— अमोल बाळासाहेब माने (पश्चिम भारत अध्यक्ष, सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ)

​🎯 पुढील कारवाईकडे संपूर्ण तालुक्याचे डोळे
​अकलूज नगरपरिषद आणि तहसील प्रशासनाने दिलेल्या नोटिसीची मुदत आता संपली असून चेंडू पूर्णपणे प्रशासनाच्या कोर्टात आहे.
​मुख्याधिकारी आणि तहसीलदार या तिन्ही अतिक्रमणधारकांवर कायदेशीर गुन्हे दाखल करणार?
​प्रशासन राजकीय दबावाला बळी पडणार की ‘अकलूज पॅटर्न’नुसार धडक कारवाई होणार?
​मौल्यवान सरकारी जमीन अखेर मोकळी होणार का?
​या सर्व प्रश्नांच्या उत्तराकडे आता संपूर्ण अकलूज आणि माळशिरस तालुक्याचे डोळे लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button