शहर

जव्हार येथे ‘वयम’ चळवळीच्या माध्यमातून पेसा मोबिलायझर ताईंची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :703051640

पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, मोखाडा या तालुक्यांमधील सर्व ‘पेसा मोबिलायझर’ ताईंची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवार दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी जांभूळविहीर येथील ‘वयम लोकशाही जागर केंद्रात’ उत्साहात पार पडली.

वयम चळवळीच्या वतीने या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत स्तरावरील अडचणींवर चर्चा या बैठकीचा मुख्य उद्देश पेसा (PESA) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या मोबिलायझर ताईंना येणाऱ्या समस्या जाणून घेणे हा होता. ग्रामपंचायत स्तरावर पेसा जनजागृतीचे काम करत असताना प्रशासकीय पातळीवर किंवा स्थानिक स्तरावर कोणत्या तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणी येतात यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक ताईंनी आपले अनुभव सांगत कामात येणाऱ्या अडथळ्यांचा पाढा वाचला.

शासकीय पत्रावर खलबते बैठकीचा दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे शासनाकडून पेसा मोबिलायझरच्या पदसंख्येबाबत प्राप्त झालेले पत्र. या पत्रातील तरतुदी आणि भविष्यातील पदसंख्येबाबत असलेल्या संदिग्धतेवर उपस्थित ताईंनी विचारमंथन केले. या संदर्भात शासनाकडे पुढील काय पाठपुरावा करायचा यावरही बैठकीत एकमत झाले.
एकजूट राहण्याचा निर्धार पेसा क्षेत्रातील समाज बांधवांच्या हक्कासाठी आणि ग्रामसभेच्या सक्षमीकरणासाठी मोबिलायझरची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व महिलांनी वेळेवर उपस्थित राहून या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे .

या बैठकीला जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यातून मोठ्या संख्येने पेसा मोबिलायझर ताई उपस्थित होत्या.वयम चळवळ जव्हार यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक यशस्वीरित्या पूर्ण झाली असून, पुढील काळात या मागण्यांसाठी सामूहिकरीत्या प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button