अमरनाथ यात्रेकरूंना मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी लाच स्वीकारणारा कर्मचारी पालघर एसीबी दादाराम करांडे यांच्या जाळ्यात अटक

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
अंबरनाथ यात्रेला जाण्यासाठी यात्रेकरूंना लागणारे सरकारी रुग्णालयाचे फिटनेस सर्टिफिकेट डायरेक्ट बाय हांड देण्यासाठी लाचेची मागणी आणि तिचा स्वीकार करणाऱ्या पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालय भाईंदर मधील अमित नाना किणी वय वर्ष (43) या कंत्राटी शिपाई कर्मचाऱ्याला पालघर अँटी करप्शन विभाग पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे यांच्या पथकाने शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी सापळा रचून पंचाक्षमक्ष तक्रारदार यांच्याकडून 3600 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करून त्याच्यावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या आरोपीला सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.सदरची यशस्वी कारवाई शिवराज पाटील पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंध विभाग ठाणे परिक्षेत्र. भागवत सोनवणे अपर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र, सुहास शिंदे अपर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे, पोलीस निरीक्षक राकेश डांगे, पोलीस हवालदार विलास भोये, योगेश धारणे, प्रकाश दळवी, जितेंद्र गवळे, आणि महिला पोलीस हवालदार गीता कहार या पथकाने केली आहे.



