शहर

महाराष्ट्र राज्य वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी पालघर जिल्हा दौऱ्या दरम्यान जलसार किरईपाडा गावातील वनविभागाच्या 600 एकर जागेतील सागांच्या झाडांची केली पाहणी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640

महाराष्ट्र राज्य वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या पालघर दौऱ्या दरम्यान त्यांनी शुक्रवार दिनांक 24 एप्रिल रोजी जलसार ग्रामपंचायत हद्दीतील किरईपाडा गावातील 265 हेक्टर म्हणजे 600 एकर पेक्षा जास्त वन विभागाच्या जागेत गेल्या 35 वर्षापासून संयुक्त वन व्यवस्थापन समिती किरईपाडा जलसार यांनी सागांच्या झाडाची लागवड करून त्याचे संवर्धन केले आहे याची पाहणी केली

यावेळी त्यांनी किरईपाडा वनविभागाच्या जागेत शासकीय विश्रामगृह बांधण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले तसेच वन विभागाकडून मिळणाऱ्या निधीतून आजूबाजूच्या गावातील रस्ते बांधून देण्याचे आश्वासन दिले तसेच जलसार टेंभीखोडावे या दोन ग्रामपंचायत हद्दीतील मोरिंची झालेली दयनीय अवस्था यांची पाहणी करून त्या लवकरात लवकर बांधून देण्यात याव्या तसेच बुलेट ट्रेन प्रकल्प सुरुंग स्फोटामुळे नुकसान झालेल्या घरमालकांना व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर लवकर देण्यात यावी असे एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना सक्त आदेश दिले

व गावाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जलसार ग्रामपंचायतीने गावात राबवलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन केले
या उद्घाटनाला महाराष्ट्र राज्य वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, पालघर लोकसभेचे खासदार डॉ.हेमंत सवरा, पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, केळवा सागरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी, पालघर माजी आरोग्य व बांधकाम सभापती दामोदर पाटील, वनविभाग डहाणू डीएफओ निरंजन दिवाकर, सब डीएफओ बांगर, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल किणी जलसार ग्रामपंचायत सरपंच साक्षी गावड,उपसरपंच विंकोश म्हात्रे, टेंभीखोडावे सरपंच शोभा पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button