शहर

भटक्या-विमुक्तांना जात प्रमाणपत्रासाठी १४ एप्रिलला ‘अन्नत्याग तंबू आंदोलन’

​नगरसेवक महेश शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; अकलूज प्रांत कार्यालयात दिले निवेदन

Times 9 Marathi News Network

​अकलूज : भटक्या व विमुक्त जाती-जमातीतील (VJNT) शेकडो कुटुंबांना कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणींमुळे हक्काच्या जात प्रमाणपत्रांपासून वंचित राहावे लागत आहे. प्रशासनाने यावर तातडीने सकारात्मक तोडगा न काढल्यास, येत्या १४ एप्रिल रोजी ‘अन्नत्याग तंबू आंदोलन’ छेडण्याचा खणखणीत इशारा नगरसेवक महेश शिंदे यांनी दिला आहे.

​या संदर्भात मंगळवारी अकलूज येथील प्रांत कार्यालयाला विशेष निवेदन सादर करण्यात आले.

भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने जात प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घ्यावी.

​आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे हा समाज शासकीय योजना, शिक्षण आणि आरक्षणापासून दूर फेकला जात आहे, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीला खिळ बसत आहे.

जातीच्या दाखल्यासोबतच आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इतर आवश्यक ओळखपत्रे मिळवण्यासाठी या कुटुंबांना प्रचंड कसरत करावी लागत आहे.

​”भटक्या-विमुक्त समाजाचा विकास केवळ कागदपत्रांच्या अभावामुळे थांबला असेल, तर ते दुर्दैवी आहे. प्रशासनाने केवळ नियमांवर बोट न ठेवता, या कुटुंबांना न्याय देण्यासाठी सकारात्मक पावले उचलली पाहिजेत. अन्यथा, १४ एप्रिलला आंदोलनाशिवाय पर्याय नाही.”— महेश शिंदे (नगरसेवक)

हे निवेदन भारतीय जनता पार्टी आणि ‘मैत्री फाउंडेशन सामाजिक व शैक्षणिक संस्था’ संचलित भटक्या-विमुक्त जाती-जमाती हक्क समितीच्या वतीने देण्यात आले. नगरसेवक महेश शिंदे हे सातत्याने या प्रश्नावर पाठपुरावा करत असून प्रशासनाचे लक्ष वेधून घेत आहेत.

​यावेळी निवेदन देताना महेश शिंदे यांच्यासह चैतन पवार, नवनाथ साठे, दत्ता पवार, तुषार थोरात, शंकर मस्के, अमोल माने, सज्जन लोखंडे यांसह समाजातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button