सुप्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन…वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज अकलूज
9890299499
मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे आज निधन झाले,त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…
पूर्वाश्रमीच्या विजया देशमुख असे नाव असणाऱ्या संध्या ह्या बालपणापासूनच नृत्याचे सादरीकरण करत असत,नवरंग चित्रपटातील “अरे जा रे नटखट” गाण्यातील स्त्री पुरुष अशी दुहेरी व्यक्तिरेखा साकारून संध्याजींनी प्रेक्षकांच्या मनात जागा टिकवून ठेवली होती…
“पिंजरा” हा त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात यशस्वी चित्रपट ठरला होता,वत्सला आणि संध्या या दोघी बहिणी लहानपणापासूनच नृत्याची कला सादर करत असत.यातूनच त्यांचे अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले होते…

संध्याजींनी मराठीसह हिंदी चित्रपटातही अभिनयाचा ठसा उमटवला होता,त्या चित्रपटात काम करत असतानाच व्ही शांताराम यांच्या सोबत त्यांचे प्रेम जुळून आले आणि त्या त्यांच्या सह विवाहबद्ध झाल्या होत्या…
विमल आणि जयश्री या दोन पत्नी असताना देखील व्हि शांताराम यांनी संध्याजींसोबत तिसरे लग्न केले होते,विशेष म्हणजे शांताराम यांच्या मुलांना त्यांनी आपलेसे केले.हिच आपली मुलं असे समजून त्यांनी स्वतःचे मुल होऊ दिले नाही.२७ सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस देखील मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला होता…
गेली अनेक वर्षे त्या वृद्धापकाळाने मिडियापासून दूर होत्या.आज संध्या शांताराम यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे,मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अनेक कलाकारांनी त्यांना आज आदरांजली वाहिली,टाइम्स 9 न्यूज नेटवर्क अकलूज परिवारातर्फे संध्याजींना भावपूर्ण श्रद्धांजली…



