महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या नगराध्यक्षांच्या आरक्षणाची सोडत येत्या सोमवारी मुंबई मंत्रालय येथे पार पडणार

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
राज्यातील २६० नगरपरिषदा आणि १७७ नगरपंचायतीं मधील नगराध्यक्ष पदां साठीची आरक्षण सोडत आता लवकरच काढली जाणार असुन यासंबंधीचा कार्यक्रम नगर विकास विभागाने जाहीर केला आहे…
ही सोडत येत्या सोमवार,दिनांक ०६ ऑक्टोबर,२०२५ रोजी मुंबई येथील मंत्रालयातील “परिषद सभागृह” ६ वा मजला येथे आयोजित करण्यात आली आहे…
नगर विकास विभागाचे उप सचिव प्रियांकु कुलकर्णी – छपवाळे यांच्या सहीने,दिनांक ०३ ऑक्टोबर,२०२५ रोजी यासंबंधीचे पत्र सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष/सचिव यांना पाठवण्यात आलेले आहे…

राजकीय पक्षांना निमंत्रण
आरक्षण सोडतीसाठी सर्व राजकीय पक्षांना प्रतिनिधी पाठवण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या पक्षाचे अध्यक्ष/सचिव यांच्या सह दोन प्रतिनिधींची शिफारस करून आरक्षण सोडतीसाठी त्यांना पाठवायचे आहे,अशी विनंती सदरच्या पत्रात करण्यात आली आहे…
मंत्रालयाच्या प्रवेशावर नियंत्रणे असल्याने,सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन ही विनंती करण्यात आली आहे.या सोडतीमुळे आगामी नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित होणार आहे,ज्यामुळे स्थानिक राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे…



