मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते स्व रहिमतुल्ला शेख यांच्या 12 व्या पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण आणि फळे वाटप कार्यक्रम संपन्न

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अकलूज येथील मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते आणि “अजातशत्रू” नेतृत्व म्हणून ओळख असलेले महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांचे अत्यंत जवळचे सहकारी स्व रहिमतुल्ला महम्मद शेख यांच्या 12 व्या पुण्यतिथी निमित्त अकलूज येथील मुस्लिम कब्रस्तान येथे “वृक्षारोपण” आणि “बजमे अन्वारे सुफीया मदरसा” येथील मुलांना फळांसह खाऊ देखील वाटप करण्यात आला…

स्व रहिमतुल्ला महम्मद शेख यांनी तहहयात अकलूज येथील मुस्लिम समाजातील सर्व सामान्य नागरिकांना मोहिते पाटील गटाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला,सबंध सोलापूर जिल्ह्या सह महाराष्ट्रात त्यांनी मोहिते पाटील गट मजबूत करण्यासाठी जीवाचे रान केले आणि आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त सदरचा छोटेखानी कार्यक्रम अकलूज येथे पार पडला…
या वेळी मुस्लिम समाजातील ज्येष्ठ हुसेनभाई शेख,स्व रहिमतुल्ला महम्मद शेख यांचे सुपुत्र शाहजहान शेख साहेब,सलीम शहाबुद्दीन सय्यद,युवक मित्र जुल्करभाई शेख,तनवीर मणियार,खलील तांबोळी,इन्नूस माढेकर,हाजी अशपाक बागवान,कलीम फकीर,अल फतह मस्जिदचे छोटा हमीद मुलाणी,रशीद शेख,बुरुड समाजातील युवा नेते महेश सुर्यवंशी,इन्नूस शेख,छोटा जावेद बागवान,रियाज तांबोळी,रियाज बागवान,इम्रान बागवान यांच्या सह बहुसंख्य मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते…



