महाराष्ट्र होमगार्ड अकलूज पथक (सोलापूर ग्रामीण) यांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

प्रतिनीधी… रियाज मुलाणी
मो.9921500780
माळीनगर: दिनांक ०५ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्र होमगार्ड (सोलापूर ग्रामीण) अकलूज पथकातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम आनंदाने साजरा झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पथकाचे तालुका समदेशक अधिकारी सुनिल सूळ यांनी ‘झाडांचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळेस अकलूज पथकाचे अधिकारी उपस्थित होते.

त्यांच्या मार्गदर्शनाने दि मॉडेल विविधांगी प्रशाला माळीनगर या शाळेच्या आवारात अकलूज पथकाच्या जवानांनी विविध प्रकारची झाडे लावली. नंतर अधिकारी वर्ग वरिष्ठ पलटन नायक तुकाराम वजाळे, पलटण नायक शहाजी पवार यांनी ‘वृक्षांचे उपयोगिता’ या विषयावर मार्गदर्शन करून सगळ्यांना झाडे लावण्यासाठी प्रेरित केले. नंतर प्रत्येक जवानांना झाडाचे रोप दिले गेले आणि कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी अकलूज पथकातील सर्व पुरुष व महिला होमगार्ड जवान यांनी सहभाग घेतला.



