महाराष्ट्र

सोलापूर येथे मर्चंट – बागवान परिवार यांचा साखरपुडा थाटामाटात संपन्न

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज अकलूज
9890299499

सोलापूर येथील सुप्रसिद्ध व्यापारी हाजी एम इब्राहिम मानाजी मर्चंट (एम राऊंड) यांची नात आणि हाजी उमरभाई मर्चंट यांची “कन्या” यांचा साखरपुडा सोलापूर येथीलच सुप्रसिद्ध मिरचीचे व्यापारी हाजी अ रज्जाक हाजी अल्लीशेर बागवान यांचे नातू आणि खालीद हाजी अ रज्जाक बागवान यांचे “चिरंजीव” सह जिनतुल इस्लाम मस्जिद,जोडभावी पेठ,मंगळवार बाजार,सोलापूर येथे रविवार दिनांक 05/10/2025 रोजीच्या गोरज मुहूर्तावर संपन्न झाला…

सदरच्या साखरपुडा कार्यक्रमासाठी माजी आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीपराव माने,सोलापूर सोशल अर्बन बँकेचे माजी चेअरमन हाजी मुनाफभाई चौधरी यांच्या सह सोलापूर शहर बागवान जमीयत सिटी ट्रस्टच्या लवाद समितीचे सर्व सदस्य,संचालक मंडळ आणि शाहीन फाऊंडेशन चे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते…

साखरपुडा समारंभानंतर ॲचीव्हर हॉल येथे हाजी एम मुश्ताक मर्चंट (एम राऊंड) यांनी आलेल्या सर्व पाहुणे मंडळी,आप्तेष्टांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले,तद्नंतर शाही आचार्यामार्फत बनविलेल्या बिर्याणी सह गोड पदार्थाची मेजवानीचा “इंतेजाम” करण्यात आला होता…

सदरच्या साखरपुड्या साठी सोलापूर,सातारा,पुणे,नगर जिल्ह्या सह कर्नाटक येथील पाहुणे आणि मित्र मंडळी यांच्या सह व्यापारी उपस्थित होते,या कार्यक्रमाचे सुनीयोजन एम हाजी उमरभाई मर्चंट यांच्या नेतृत्वाखाली “एम राऊंड ग्रुप” ने केले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button