शहर

मा नगरसेविका यास्मिन बागवान यांची अल्पसंख्यांक विकास मंडळाच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पदी निवड…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

बारामती नगर परिषदेच्या माजी नगरसेविका यास्मिन बागवान यांची अल्पसंख्यांक विकास मंडळाच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्र अल्पसंख्यांक विकास मंडळाचे
संस्थापक अध्यक्ष शोएबभाई खाटीक यांनी त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डल व्दारे पब्लीश केली अशी माहिती अल्पसंख्यांक विकास मंडळाचे पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख आमीर मोहोळकर यांनी दिली…

अल्पसंख्यांक विकास मंडळाच्या महिला प्रदेश अध्यक्षा फरहत देशमुख यांच्या विश्वासू सहकारी असलेल्या आणि बारामती नगर परिषदेच्या माजी नगरसेविका राहिलेल्या यास्मिन बागवान यांच्या निवडीने अल्पसंख्यांक समाजातील सर्व स्तरातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे…

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या यास्मिन बागवान ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदावर देखील कार्यरत असुन बारामती शहरातल्या अनेक सामाजिक संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध आहे…

अल्पसंख्याक विकास मंडळाच्या वतीने संघटनेत त्यांचे स्वागत असुन पुणे जिल्हा महिला अध्यक्षा म्हणुन हि त्या आपली कारकीर्द गाजवतील असे गौरवोद्गार शोएब भाई खाटीक आणि महिला प्रदेश अध्यक्षा फरहत देशमुख यांनी व्यक्त केले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button