आज नारायण आबा पाटील आमदार असते तर रोपळे शिवारात दहीगावं उपसाचे पाणी पोहचले असते..पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर

करमाळा प्रतिनिधी
आलिम शेख
मोबाईल नंबर 98 50 68 63 60
नारायण(आबा) पाटील आमदार असते तर रोपळे शिवारातील बंधाऱ्यात दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी पोहचले असते असे ठाम मत पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी व्यक्त केले. याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर म्हणाले की सन २०१४ ते २०१९ दरम्यान तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतील म्हणजेच आमदार फंडातील चाळीस टक्के रक्कम ही माढा तालुक्यातील ३६ गावांना दिली. या भागातील काम करत असताना कधी गट तट पहिला नाही. विकास कामे घेऊन येतील त्या सामाजिक अथवा राजकीय कार्यकर्त्यांना तत्काळ शिफारस पत्र दिली. यामुळे सभा मंडप, वाडी वस्ती वरील रस्ते, पाण्याची सोय, बंधारे आदीसह अन्य कामे झाली. दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी मसेवाडी तलावात पोहचवले पण त्याच वेळी वडशिवणे तलावात सुद्धा पोहचवले. या योजनेच्या पावसाळी आवर्तन मधून केम ओढ्याच्या माध्यमातून व पुढे चारी निर्माण करून रोपळे शिवारात पाणी पोहचण्याचा माजी आमदार नारायण पाटील यांचा संकल्प होता. त्या दृष्टीनं प्राथमिक सर्व्हे सुद्धा करण्यात आला. आज जर नारायण पाटील आमदार असते तर रोपळे व परिसरातील बंधारे पाण्याने भरून या भागातील शेतकऱ्यांना वर्षातून एकदा शेतीसाठी पाणी दिले असते.माढा तालुक्यातील बेंद ओढ्याचा प्रश्न कधीच सोडवला असता. सीना नदी वर बॅरेज बांधली असती. ३६ गावातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लागली असती. आज या भागातील नागरीकास विकासाचे महत्व समजू लागले असून २०१९ मध्ये आपले मतदान वाया गेल्याची खंत त्यांना वाटू लागली आहे. ३६ गावांचा विकास वेगाने होऊन या भागाचा संपूर्ण कायापालट होईल हा आशावाद धुळीस मिळाला असून आता या भागातील जनता आगामी निवडणुकीची वाट पाहत आहे. ज्या भागाने संजय मामा शिंदे यांना आमदार केले तोच भाग आता सन २०२४ मध्ये नारायण(आबा)पाटील यांना विकासकामे मार्गी लागावी म्हणून एक संधी देणार असल्याचा ठाम विश्वास तळेकर यांनी व्यक्त केला.



