संपादकीय

मोहिते पाटील घराण्या वर व्यक्ती म्हणून , कार्यकर्ता म्हणून माझे प्रेम का?

अकलूज प्रतिनिधी

ऍड अविनाश टी काले , अकलूज मो न :-9960178213

मानवी जीवन , आणि माणसाचा विकसित झालेला मेंदू ही फार गुंता गुंती ची प्रक्रिया आहे , इथे जीवनात प्रेम आहे , द्वेष आहे , इर्षा आहे , आसक्ती आहे , स्पर्धा आहे , या साऱ्या भाव भावनांचा अविरत चाललेला अंतर्गत संघर्ष म्हणजे माणसांचे वर्तन ,,,, मी सुरुवातीलाच हे स्पष्ट केले आहे की चळवळ हा माझा प्राण व श्वास आहे , आणि तो कायम स्वरुपी राहील , मला आठवतं नाही पण , मी नववी त असताना तंबाखू खायला शिकलो , ती आज तागायात सुटली नाही ,कॉलेज जीवनात ही चळवळी चालूच होत्या , अर्थात युवा अवस्थेत त्या पराकोटीच्या जहाल असतात , माझे वडिलांना ही त्याची चिंता वाटायची , ते मला आंबेडकर वाद नीट समजून घे , मग तुला मार्क्स वादाचे आकर्षण राहणार नाही असे म्हणायचे ,

त्यांची चिंता साहजिक अन वाजवी होती , बाप म्हणून ते काळजी करत होते , कारण तो मार्ग जहाल अश्या विचारसरणीचा होता ,,, कॉलेज जीवनात इतरांच्या जीवनात जसे प्रेम फुलते तसे प्रेम माझ्या ही जीवनात आले , आम्ही विवाह करणार होतो , त्या वेळी तिने ही अट टाकली , तू कुठेही आणि कोणत्याही पक्षात काम कर पण ती चळवळ सोड ,,, मी तिला सांगितलं , मी जगातील सर्व गोष्टी सोडू शकतो , पण तंबाखू आणि चळवळ नाही ,, आणि तिला मी माझ्या जीवनाच्या कॅनव्हास वरून पुसून टाकले , पुढे लग्न झाले , मुले मुली झाल्या , आणि वडील हे जग सोडून गेले , साधे बिस्कीट चां पुडा आणायचा कसा ? हे ही माहीत नसलेला मी , जबाबदारी घेऊन जगणे सुरू झाले अपघाताने मी संसदीय राजकारणात आलो , आमचे शेताचे पलीकडे लुमेवाडी येथे पवार साहेबांच्या प्रचारा साठी सभा होती , आणि वक्ता म्हणून त्यांनी मला बोलावले आणि मी ती सभा केली , व दुसरे दिवसा पासून सशस्त्र पोलीस बंदोबस्त देऊन वक्ता म्हणून मी इंदापूर तालुक्यात सभा घेत फिरू लागलो , ना अजित दादा यांनी प्रभावित होऊन ती व्यवस्था केली होती पुढे विजय प्रताप युवा मंच चे बेरोजगार युवक मेळावा आणि त्याची बांधणी करत फिरु लागलो ते आ रणजित सिंह मोहिते पाटील व धैर्य शील जी मोहिते पाटील साहेब यांचा सहकारी म्हणून प्रवास सुरू झाला चळवळीतील समतेचे आणि क्रांतिकारी बदलाचे प्रयोग संसदीय राजकारणातून साध्य करण्याचा माझा प्रयत्न म्हणजे मला संसदीय प्रणाली आत्मसात न झाल्याची निशाणी होती संसदीय राजकारण असो किंवा व्यक्तिगत जीवन तुम्हाला नकार देता आला पाहिजे . असा नकार मला कधी देता आला नाही , त्या मुळे माझ्या कडे माणूस आला की ते काम नेत्या कडे नेलेच म्हणून समजा,,,,,! त्यात ही प्रत्येकाचे बाबीत मी व्यक्तिगत दृष्ट्या गुंतत होतो , आपण नेत्यावर किती बोजा टाकत आहोत याचे ही भान सुटत असे , यात कुठे ही व्यक्तिगत पातळीवर कांहीं ही मागणी नसायची ,, राजकारण हे आवड म्हणून करायचे , घरची भाकरी खावून ते करायचे , आणि शेती सुधारणा किंवा पिके घेण्यासाठी ही पैसा इकडून तिकडून मिळवायचा ते ही पतसंस्थेची कर्ज काढून ,, एका पत संस्थेने घरावर जप्ती आणली होती , आणि मी बाहेर गावावरून आलो होतो , दुसऱ्या दिवशी पोलीस घेऊन वसुली अधिकारी येणार होते , रात्रीचे 10वाजले होते , मी थेट शिव रत्न गाठले , मी गेट वरून आत जाताना पाहिले आदरणीय विजय दादा हे घरात चालले होते आणि जाण्या पूर्वी त्यांनी टाकलेली सहज नजर माझ्या वर पडली , आणि दादा माघारी फिरले , काय अविनाश? काय झाले ? मी दादांच्या हातात कागद दिला ,, दादांनी मला विचारले ,, त्या वसुली अधिकाऱ्याचा फोन नंबर आणला आहे काय? मी तो आणला नव्हता , तो मी आमच्या वकील मित्रा करवी (ऍड भारत क्षीरसागर) तिथेच बसून मिळवला आणि दादासाहेबांनी फोन लावला , “काले माझा माणूस आहे , तुझी पतसंस्था तिकडेच पेटव,,,, जर तिथे कांहीं गडबड केली तर माझ्या शी गाठ आहे ” ज्यांनी उप मुख्यमंत्री पद भूषवले , ते दादा आपल्या कार्यकर्त्या साठी वज्र बनून उभे राहतात हे मी अनुभवले , माझ्या मुलांनी आंतर जातीय विवाह केला , तेंव्हा दादासाहेब म्हणाले , कोणाचा त्रास , धमकी असेल तर सांग ,, मी स्वतः येतो ,,, आमचे नात्यातील एका प्रसंगात माझ्या मामाला पोलीस इन्स्पेक्टर त्रास देत होते , माझ्या मामाच्या मुलीला सासरचा त्रास होता , न्याय देण्या ऐवजी लाच खावून आम्हालाच त्रास देणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टर ला धैर्य शील भैय्या साहेबांनी फोन करून सांगितले “ती मुलगी आमचे घरातील आहे , जर उलटे वागलात तर सुलटे करू ,,, राजकारणातील विसंवाद आणि समज गैर समज यातून आमच्यात ही मतभेद झाले , माझ्या इतक्या कडवट आणि कठोर टीका मोहिते पाटील यांच्यावर कोणीही केल्या नसतील , पण त्यांनी मला या मुळे कधीच टॉर्चर केले नाही , कधी मनात आकस धरला नाही , आमच्या घरातील एकाने राजकारण करावे आणि दुसऱ्या भावाने शेती किंवा उद्योग करावा असे आ रणजित दादा यांनी ही समजावून सांगितले , पण राजकारण हाआमच्या घरातील सार्वत्रिक रोग आहे , त्या मुळे विकासाची फुले आम्हाला वेचता आली नसतील तर तो दोष आमचा आहे , त्यांनी सर्व संधी देण्याचा प्रयत्न आमच्या वरील प्रेमा पोटी केला , पण संधी ना आम्ही कधी शोधली , ना संधी चे मागे धावत सुटलो ,, पण आत्ता मुलांना मी सांगितले आहे , या सार्वत्रिक राजकीय रोगाचा शेवट आमच्या सोबत करा , ,, तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसाय याचे मार्गाने जा , आपले गाव आपले कुटुंब या नात्याने सर्वांशी मिळून मिसळून रहा , मोहिते पाटील हे आपल्या जिल्ह्याचे कुटुंब कर्ते आहेत , त्यांच्या इतकी समज आणि संयम इतर कुणा कडेही नाही , त्यांचे सोबत राहिलात तर शांती ,स्थैर्य आणि विकासाची शास्वत हमी या बाबी ठरलेल्या आहेत ,,, आपण काय आमदार खासदार होण्याच्या शर्यतीतील माणसे नाही आहोत ,, ती आपली स्वप्न कधी ही नव्हती , पण माणूस म्हणून आणि जबाबदार नागरिक म्हणून आपण जगू ,, जे प्रत्येक सुख दुःखा त आपल्या समवेत उभे राहिले , आपल्या जीवनाचा आधार बनले अश्या नेत्यांना विसरून चालणार नाही मला सर्व परिस्थिती माहीत आहे , जिल्हा आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उपद्रव खोरी करणाऱ्या टोळीचे साम्राज्य उभे आहे हे ही मला माहित आहे , कोणतीही लढाई ही लढाई असते , कोणताच शत्रू कधीच कमजोर समजण्याची चूक करायची नसते , ही लढाई सत्य आणि असत्य यातील आहे , , धर्म आणि अधर्म यातील आहे , आज कौरवांच्या बाजूने अफाट सैन्य उभे आहे , पण नियतीचा खेळ ज्यांनी मांडला आहे ते भगवान श्री कृष्ण हे सत्याचे बाजूने उभे आहेत , तीच आपली शक्ती आहे , सोलापूर जिल्ह्यातील नेते कृतघ्न झाले आहेत , यांच्या कृतघ्न तेच्या आरोळ्या आणि प्रचार तंत्राने “धर्म राज” ही कोड्यात पडलेले आहेत ,, मोहिते पाटील यांचा दोष काय होता ? माळशिरस तालुका राखीव सदरात गेल्या क्षणी , हे वारे फिरले , जी मोहिते पाटील घराण्याची राजकीय शक्ती होती ती अनेकांनी वापरून आमदारकी ची तिकिटे फिक्स करून घेतली , त्यांच्या शिफारशी वापरून स्वतः चे आर्थिक राजकीय बस्तान बसवून घेतले , मोहिते पाटील यांच्यावर जीवा पाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याला खरी शक्ती मोहिते पाटील देऊ शकले नाहीत , पण विकासाचे दूध या अस्तनितील सापांना पाजण्यात जिंदगी गेली , राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काड्या करून ज्या टोळक्याने त्रास दिला , त्या मुळे तो पक्ष सोडून भाजपला विना अट तन मन धन खर्ची घालून पाठबळ दिले , तिथे ही हाच कंपू पुन्हा घुसखोरी करून आला , पक्ष वाढीच्या कार्यक्रमाचे अजेंड्या पुढे पुन्हा एकदा धूसर परिस्थिती अस्तित्वात आली हे या पुढे ही असणार आहे , आपण ही इथेच राहतो , ते ही इथेच राहतात , पण शेती करायची असेल तर बाभळी जेसीबी लाऊन उपटून काढाव्या लागतात ,,, ह्या वेड्या बाभळीचे काटे सर्व दूर पसरलेले आहेत , त्यांना एकत्रित करून आत्ता काडी लाऊन नायनाट केल्या शिवाय आपल्या पुढे ही पर्याय नाही कै आ हनुमंत राव डोळस साहेब मला म्हणाले होते ,, काले , भक्त पायऱ्यांवर तर कावळे शिखरावर बसतात ,, हे खरे आहे , शिखरावरील कावळ्यांना हुसकावून खऱ्या जमिनी वरच्या मावळ्यांना एकत्रित करून ही लढाई लढू,,,, वकिली पेशा तील आणि सार्वजनिक जीवनातील आमचे आदर्श असणाऱ्या सरांनी मला प्रश्न विचारला , तुम्ही इतके भावनिक व आक्रमक का होता ? मी सरांना म्हणालो , ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे , आणि माझी शेवटची खेळी आहे ? त्यावर त्यांना ही प्रश्न पडला शेवटाची म्हणजे? मी त्यांना सांगितलं , माझा जीव शेतीत रमतो ,,, तो एकांतात , , निसर्गात , आणि जिथे माझ बालपण गेलं त्या नदीच्या काठाला ,,,, या नंतर मी शेतीतील प्रयोग करत बसणार आहे ,, माझ्या गरजा कमी आहेत म्हणून मी ना इर्षा करतो ना स्पर्धा ,, पण व्यक्तिगत अनुभवातून मला जाणवलं की , जिथे माझ्या सह 40घरे पाडण्याची नोटीस प्रशासक कडून आली होती , खा निंबाळकर साहेब यांनी जिल्हाधिकारी यांना एक पत्र द्यावे अशी विनंती केली होती , त्या पत्राचा मसुदा दोन वेळा उत्तम राव जानकर साहेब यांच्या कडे पाठवला परंतु चार ओळीचे पत्र आणि सही आज 4महिने उलटून गेले तरी मिळाले नाही , माझा स्वतः चां कायद्याचा अभ्यास असल्याने , आणि बॅकवर्ड क्लास को ऑप हौसिंग सोसायटी ने आम्ही राहत असलेली लगतची जागा कोणतीही ऑर्डर नसताना स्वतः ची म्हणून दर्शवल्याचे , पुरावे माझ्या कडे आहेत , शिवाय 2011चे पूर्वी एस सी एस टी प्रवर्गा तील लोकांनी शासकीय जागेवर निवासी अतिक्रमण केले असेल तर ते न काढण्याचा कायदेशीर जी आर आमचे सोबत आहे , पण एक बाब यातून स्पष्ट झाली ती ही की तुमच्या आमच्या साधारण गरजा आणि प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी आपला जवळचा माणूस आवश्यक असतो , आपल्या हक्काचा तो असावा लागतो , असा हक्काचा आपला माणूस धैर्य शील जी भैय्या साहेब यांच्या रूपाने अस्तित्वात असताना , आम्ही इतरांना कोणत्या दृष्ट भावनेने समर्थन द्यावे? दुसऱ्याच्या उशाला बसण्या पेक्षा आपल्या चे पायाजवळ बसावे दुसऱ्याच बारा वर्षाचं अन् आपल बारा दिवसाचं ही भारी असत ,, ज्या फलटण तालुक्याने त्या नेत्याला स्वतः चे मानले नाही अश्या नेत्याला आमच्या खांद्यावर आणून बसवण्याची खेळी हाणून पाडणे आवश्यक आहे , हा भाजप प्रति द्रोह नाही , भाजप ला आव्हान ही नाही , पण कोणताच दोष नसताना हे तुम्ही आम्हाला डावलण्याचे पाप करू नका हे सांगणे आमचे काम आहे कारण आमच्या नेत्यावर त्यांचा दोष नसताना आम्ही अन्याय होऊ देणार नाही , असा अन्याय झालाच तर आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ आणि सर्व इतिहास ही सांगू ,,, आमचे आमच्या नेत्यावर प्रेम आहे ते बाजारू , अपेक्षेने केलेले नाही ते अस्सल आणि तितकेच खणखणीत आहे , जे प्रेम कोणत्याच किमती वर विकत घेतले जाऊ शकत नाही , अगदी पक्ष ही ते बदलवू शकत नाही तूर्त इतकेच,,,,,,,,!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button