महाराष्ट्र

शाश्वत शेती दिनानिमित्त वेळापूर मुली शाळेत कृषिकन्यांचा उपक्रम.डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शाळेत जनजागृती कार्यक्रम

टाइम्स 9 न्यूज नेटवर्क

वेळापूर (ता. माळशिरस) —महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज येथील कृषिकन्यांनी 7 ऑगस्ट – शाश्वत शेती दिन या निमित्ताने वेळापूर मुली शाळेत , विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले.

या कार्यक्रमाचे औचित्य हरित क्रांतीचे जनक डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त साधण्यात आले. शासनाने जाहीर केलेल्या “शाश्वत शेती दिना”निमित्त कृषिकन्यांनी विद्यार्थिनींना शाश्वत शेती म्हणजे काय, त्याचे प्रकार, महत्त्व, तसेच भविष्यातील पर्यावरणपूरक शेतीची गरज यावर सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमामध्ये पारंपरिक पद्धतींचा सन्मान राखून आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने शेतीत टिकाऊपणा कसा आणता येतो, हे स्पष्ट करण्यात आले.कृषिकन्यांनी शेतीमध्ये जैविक शेती, जलसंधारण, पीक पद्धती यासारख्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संग्रामसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य.आर.जी. नलावडे, तसेच प्रा. एस.एम. एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक), प्रा. एम.एम. चंदनकर, प्रा. एच.व्ही. कल्याणी यांचे मार्गदर्शन लाभले.

शाळेचे मुख्याध्यापक युन्नूस तांबोळी, नितीन चव्हाण सर,सौ. अनिता रजनीश बनसोडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.या वेळी शाळेचे सर्व शिक्षक, ग्रामस्थ रमेश बनकर, शंकर भाकरे, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन पुढील कृषिकन्यांनी केले :
आरती मंडले, मोहिनी कानडे, वैष्णवी हिवरकर, योगेश्वरी मदने, अनुपमा गोसावी, प्राजक्ता जाधव, राजनंदिनी डिकोळे, सिद्धी पाटील आदी.

शाश्वत शेतीद्वारेच पर्यावरणाचा समतोल राखत उत्पादनवाढ शक्य आहे, असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाला. कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button