मानस सन्मान सोहळ्यात विरार येथील सौ. मानसी पत्याणे यांना बेस्ट बिजनेस वुमन सन्मान बहाल

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
महाराष्ट्र स्टेट मँगो ग्रोवर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित भव्य अशा मानस सन्मान सोहळ्यात WeRmore Solutions Pvt. Ltd. च्या Sapphire Director आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व सौ. मानसी पत्याणे यांना Best Business वूमन या सन्मानाने नामांकित करण्यात आले आहे.
या प्रतिष्ठीत कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दिनांक 07 ऑगस्ट 2025 रोजी बीकेसी वांद्रे, मुंबई येथे करण्यात आले होते. महाराष्ट्र भरातून अनेक मान्यवर तसेच महिला उद्योजिका, सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी यांचा देखील या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.

विरार येथील सौ. मानसी पत्याणे यांचे योगदान स्त्रियांच्या आरोग्यविषयक जनजागृती विशेषतः मासिक पाळीचे आरोग्य आणि महिलांच्या आत्मसक्षमीकरणासाठीच्या कार्यासाठी संपूर्ण राज्यभर पोहोचले आहे. त्याच बरोबर नेटवर्क मार्केटिंगच्या क्षेत्रातही त्यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी मोठे कार्य करून दाखवले आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठीत संस्था म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र स्टेट मँगो ग्रोवर्स असोसिएशन यांनी या विशेष सन्मानासाठी मानसी पत्याणे यांना निमंत्रित करून त्यांचा हा सन्मान केला आहे.
हा सन्मान केवळ मानसी पत्याणे यांचा नाही तर एक संपूर्ण समाजासाठी आणि समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रेरणास्थान ठरणारा आहे.



