महाराष्ट्र

अकलूज बाजार समितीत भाजीपाल्याचे लिलाव कॅरेट ऐवजी वजना प्रमाणे करण्याची जनसेवा संघटनेची मागणी.

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

अकलूज बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे लिलाव हे वजनावर न होता कॅरेट प्रमाणे केले जात आहेत यामुळे शेतकऱ्यांचे जास्त प्रमाणात नुकसान होत आहे.
या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना व सर्व शेतकऱ्यांचे वतीने, मागणी करण्यात आली आहे.
बाजार समितीतील भाजीपाला लिलाव वजनाप्रमाणे झाला पाहिजे. भाजीपाला वजन करून विकल्यास शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल आणि खरेदीदारांचीही फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल. 

तसेच बाजार समितीत भाजीपाला लिलाव करताना वजनकाटा प्रमाणित असणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी.
तसेच शेतकऱ्यांचे पट्टीमध्ये कमिशन कपात करु नये अन्यथा जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली जनसेवा संघटनेचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे पत्र जनसेवा संघटनेचे वतीने देण्यात आले आहे.या वेळी जनसेवा संघटनेचे अमर काळे, नितीन साखळकर,वल्लभ गुजर, डॉ.उदय पवार यांचे सह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button