विधानसभेच्या निवडणुकी अगोदर शरद पवार यांच्या कडे आलेले ते दोघे कोण…? जनतेला पडलेला प्रश्न…

✅ शिवसेना आणि मनसे यांची युती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पासून सुरू होतेय… संजय राऊत यांचे विधान…
आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
आज नागपूर येथे पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना देशाचे नेते शरद पवार यांनी असे म्हटले की,महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी माझेकडे दोन लोक आले होते आणि त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या 288 जागा पैकी 160 जागा निवडून आणण्याची “गॅरंटी” दिली होती,तदनंतर “त्या” दोन लोकांना स्वतः शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्याकडे दिल्ली येथे भेट घालून दिली होती असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी करून महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली…
शरद पवार यांचं व्यक्तिमत्त्व कसे आहे…? हे सबंध महाराष्ट्र तर जाणतोच आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांत होणार असुन त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय… असा प्रश्न उपस्थित होत आहे…
महाराष्ट्राचे राजकारण कोळून पेलेले राज्यातील एकमेव नेते शरद पवार यांनी आज नागपूर येथे केलेले वक्तव्य काय सांगून गेले हे पक्क्या राजकारण्यांच्या ध्यानात आले की नाही हे माहीत नाही परंतु वैचारिक दृष्ट्या शरद पवार यांनी विरोधकांना आत्ता पासूनच कात्रजचा घाट दाखवायला सुरुवात केली आहे असे वाटत आहे…
त्यांच्या आजच्या वक्तव्याने या आठवड्यातील किती तरी घटनांवर पाणी फेरले गेले,मिडिया वाल्यांच्या कॅमेऱ्यांनी शरद पवार यांचेच “ब्रेकिन न्यूज” सुरू केले आणि एवढ्या दिवस अज्ञातवासात असलेले शरद पवार आज सकाळ पासून सोशल मीडियावर झळकू लागले…

तर तिकडे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेत शिवसेना आणि मनसे यांची युती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून सुरू होत असल्याचे जबाबदार वक्तव्य केले…
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदे मध्ये ते जे जे वक्तव्य करत असतात ते त्यांच्या पक्षीय धोरणानुसार किती महत्वाचे ठरतात हे त्यांचे त्यांना माहित असते परंतु त्यांनी हि आज केलेले वक्तव्य भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही…
तसे पहायला गेल्यास शरद पवार आणि संजय राऊत यांनी गेल्या काहीं वर्षांमध्ये सबंध महाराष्ट्राच्या राजकारणात कसा “धुमाकूळ” घातला आहे,हे सर्वश्रुत आहे आणि अशातच आज राखी पौर्णिमेचे औचित्य साधत या दोन मातब्बर नेत्यांनी केलेले वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देण्याचे ठरू नये म्हणजे झालं…
एखाद्या वेळेस शरद पवार यांचे भाजपा बद्दलची “रणनिती” कशी आहे ते लवकर समजून येणार नाही परंतु संजय राऊत यांचे भाजपा “द्वेष” पटकन जनतेच्या ध्यानात आल्या शिवाय राहिल्या नाहीत,तरीही महाराष्ट्रातील पक्का राजकीय माणूस या दोन नेत्यांच्या आजच्या वक्तव्याला सहजासहजी घेणार नाही हे मात्र तितकेच खरे…



