कुरेशी समाजाच्या मागण्यां संदर्भात अजित पवार यांनी घातले लक्ष…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
कुरेशी समाज हा परंपरेने मांस व्यापाराशी जोडलेला असून महाराष्ट्राच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे.त्यामुळे या समाजाच्या व्यापाऱ्यांवर आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही,अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुरेशी समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली…
सबंध महाराष्ट्रात सध्या अल कुरेश जमातीच्या लोकांनी बजरंग दल आणि या संघटने सारख्या स्वयंघोषित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अमानुष त्रासाला कंटाळून सध्याच्या घडीला सबंध व्यापार बंद ठेवला आहे…

या व्यापारामुळे नुसत्या कुरेशी समाजाच्या लोकांचेच हाल होत नसून महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा अडचणीत आल्याचे पहायला मिळत आहे,एकंदरित पणे जर विचार केला तर कुरेशी समाज हा नेतृत्व हिन समाज असून अशा वेळी आमदार सना मलिक यांनी वेळीच लक्ष घालून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह हि बैठक घेतली असल्याचे टाइम्स 9 च्या सुत्रांनी सांगितले…
बैठकीदरम्यानच उपमुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करुन कुरेशी समाजाला जनावरांची वाहतूक करत असताना येत असलेल्या अडचणींबाबत माहिती दिली…
जनावरांची वाहतूक करण्यासंदर्भात असलेल्या कायद्यात बदल करण्याबाबत कुरेशी समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करुन निर्णय घ्यावा,अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.

या बैठकीस आमदार सना मलिक,आमदार संजय खोडके,माजी मंत्री नवाब मलिक,पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला,मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती,फेडरेशन ऑफ महाराष्ट्रीय मुस्लिम,मुंबई अमन समिती,अल – कुरेश सामाजिक विकास मंडळ,ऑल इंडिया जमीयतुल कुरेश संघटना,ऑल महाराष्ट्र जमीयतुल कुरेश संघटना या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते…



