शहर
पालघर जिल्ह्यातील आलोंडे येथे छत्रपती शिवाजी महाराज शासकीय समाधान शिबिराचे आयोजन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
विक्रमगड तालुक्यातील ग्रामपंचायत आलोंडे येथे छत्रपती शिवाजी महाराज शासकीय समाधान शिबिराचे आयोजन उत्साहात पार पडले.या शिबिरात विविध योजनांचे लाभ पात्र नागरिकांना वितरित करण्यात आले.

या कार्यक्रमात आमदार हरीचंद्र भोये , कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती संदीप पावडे, माजी सभापती खुताडे , तसेच तहसीलदार चव्हाण यांच्या हस्ते विविध लाभांच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या शिबिराच्या माध्यमातून साध्य करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत आलोंडेचे ग्रामविकास अधिकारी, सरपंच, सदस्य, आणि अधिकारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते



