लातूर मध्ये अजित दादा गटाचे युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केली “छावा” संघटनेच्या विजय घाटगे या कार्यकर्त्यास मारहाण

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
त्याचे झाले असे की,काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान भवनात ऑनलाइन रमी खेळतानाचा विडीओ शेअर केला होता…
अगदी तोच धागा “छावा” संघटनेचे कार्यकर्ते असलेले विजय घाटगे यांनी धरून सुनील तटकरे यांना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यास काय हरकत आहे अशा प्रकारचे निवेदन दिले होते…
याच गोष्टीचा राग मनात धरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित (दादा) पवार गटाचे युवक अध्यक्ष सुरज चव्हाण आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यानी “छावा” संघटनेच्या विजय घाटगे या कार्यकर्त्यास जबरदस्त मारहाण केली असल्याचे सोशल मीडियावर पहायला मिळाले आहे…
आता याच्या उलट महाराष्ट्रामध्ये त्या विजय घाटगे या “छावा” संघटनेच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल होईल असे वाटत आहे कारण जवळ जवळ अशीच घटना गेल्या आठवड्या मध्ये अक्कलकोट येथे घडली आणि त्या घटनेत संभाजी ब्रिगेड चे प्रवीण गायकवाड बालंबाल वाचले…
देवेंद्र फडणवीस – अजित दादा पवार – एकनाथ शिंदे यांचे “अजब सरकार” असुन भविष्यात सुरज चव्हाण ने केलेल्या या कृत्यामुळे एखादे वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचा आता “राष्ट्रीय युवक अध्यक्ष” होइल,असा अंदाज व्यक्त होत आहे…
तसेच मराठा समाजाच्या बांधवांवरच सरकार हल्ला का करत आहे…? असा प्रश्न उपस्थित होतो,देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार विरोधी एखाद्या संघटनेने आंदोलन करणे किती “घातक” झाले आहे याचे आणखी एक उदाहरण आज पहायला मिळाले,परवा संभाजी ब्रिगेड चे प्रवीण गायकवाड यांच्या वर देखील असाच हल्ला अक्कलकोट येथे करण्यात आला होता…
परंतु देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्या प्रमाणे या सरकार मधील मंत्री आणि आमदार खरेच माजले आहेत या गोष्टींवर देखील आज शिक्का मोर्तब झाले…
या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकार मधील एकाही मंत्र्याने आणि आमदाराने शेतकऱ्यांबद्दल एक चकार शब्द हि कुठे काढला नाही हि अत्यंत लाजिरवाणी बाब आहे…
या सगळ्या गदारोळात राज्याचे कृषी मंत्री विधानभवनात मोबाईल वर “रमी” खेळत असतील तर त्यांचा राजीनामा घ्यावा असे विचारण्यासाठी गेलेल्या “छावा” संघटनेच्या कार्यकर्त्याचे चुकले काय…?
आता सरकार विरोधी “आंदोलन” करणे सुद्धा जर असे “घातक” ठरत असेल तर “लोकशाही” धोक्यात आहे आणि नुकसान हे मात्र जनतेचे होत आहे हे तुम्हा आम्हास विसरून चालणार नाही…
तिकडे राज्याचे गृह राज्य मंत्री योगेश कदम यांच्या “मातोश्री” डान्स बार चे मालक आहेत आणि “बॉक्सर” संजय गायकवाड आणि “डॅशिंग” गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता असलेले नितीन देशमुख यांना मारहाण करत “कायदा” हातात घेऊन चक्क खोटं बोलत आहेत…
एकनाथ शिंदे आपला पक्ष वाचवण्यासाठी सतत “दिल्ली” वारी करत आहेत,प्रताप सरनाईक नावाचे नावाचे जबाबदार मंत्री सुद्धा कृषी मंत्र्यांचा बचाव करताना दिसत आहेत,फुले शाहु आंबेडकर यांच्या “पुरोगामी” महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बिहार करूनच दाखवला असे आता जनतेला वाटत आहे…
हे सर्व घडत असताना महाराष्ट्रातील “बहुजन” समाज मात्र फरफटला जात आहे,लाडक्या बहिणी हि नाराज आहेत,अल्पसंख्यांक,दलित आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर दिवसेंदिवस हल्ले होत आहेत…
संभाजी भिडे सारखे लोक भारताच्या ध्वजांवर आक्षेप आणू पहात आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित होताना देवेंद्र फडणवीस सरकार मात्र आपल्या आमदार आणि मंत्र्यांच्या चुका पोटात घालून घेत आहे आणि महाराष्ट्रातील जनता मात्र “उद्या राजकारणात काय घडतंय” या कडे लक्ष लावून आहे…
या सर्व घडामोडी नंतर अजून पर्यंत तरी अजित दादा (पवार) यांनी आपले स्टेटमेंट मीडियाला दिलेले नाहीय,एखादे वेळेस अजित (दादा) पवार जर मीडिया समोर येऊन बोलले तर ते काय बोलतील या कडे मात्र सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे…
आणखी एक विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या सोज्वळ वाणीतून मंत्री मंडळातील आपल्या सहकाऱ्यांचा कसा बचाव करतात हे पाहणे सुद्धा महत्वाचे ठरेल असे वाटत आहे…
एकंदरित पणे “पुरोगामी” महाराष्ट्राचा “बिहार” होताना दिसत असताना “बहुजन” समाज मात्र हताश झालेला पहायला मिळत आहे अशात जनतेची त्रेधातिरपीट उडाली असून तीच जनता आशाळभूत नजरेने बुक्क्यांचा मार सोसत आहे,असे सध्या तरी वाटत आहे…



