निमगाव केतकी ता.इंदापूर येथील ग्रामपंचायत सदस्य शासकीय निधी खर्च न करता केवळ पोस्टरबाजी करून जनतेची दिशाभूल करतात – सचिन भैय्या शिंदे

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
निमगाव केतकी, ता. इंदापूर येथील ग्रामपंचायत ही मोठी असून निमगाव केतकी हे इंदापूर तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ मानली जाते त्यामुळे या ग्रामपंचायतीस शासनाच्या वतीने आणि आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या आमदार फंडातून निधी उपलब्ध झाला आहे मात्र ग्रामपंचायत बॉडीने त्याचा उपयोग विकास कामाला केल्याचे निदर्शनास येत नाही केवळ आणि केवळ शासनाकडून आणि आमदार फंडातून निधी आल्याची पोस्टरबाजी आणि बॅनरबाजी करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सत्ताधारी करत आहेत त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे इंदापूर तालुका माजी उपाध्यक्ष सचिन भैय्या शिंदे यांनी निमगाव केतकी ग्रामपंचायत हद्दीतील पुढील समस्यांचा तर पाढाच वाचला
१) वार्ड नंबर ६ चा विकास काय झाला ते जनतेला सांगा नुसती बॅनरबाजी नको
२)भैरोबा मळा रस्ता झाला का? कुस्ती आखाडा ते भैरोबा मळा रस्त्याचे काम झाले का?
३) बावकर वस्ती ते माने वस्ती रस्ता झाला आहे का? हे जनतेला दाखवून द्या
४) काळा मळा येथे एक तरी सभा मंडप बांधला आहे का? हे जनतेला दाखवून द्या
५) केतकेश्वर महादेव मंदिर रस्ता तयार झाला का ?
६) बापूराव हेगडे ते मुलाणी वस्ती लाईट पोल बसवले का?

या व अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे ग्रामपंचायतच्या सरपंचासह सदस्यांनी द्यावी मात्र आपण जनतेची दिशाभूल करत आहात त्यामुळे जनता तुम्हाला माफ करणार नाही. काही लोक व ग्रामपंचायत सदस्य असे आहेत की फक्त बॅनरबाजी करून निधीचा दुरुपयोग करत आहेत. आणि यांनी हा सर्व निधी कुठे खर्च केला हे दाखवण्याची हिंमत दाखवतील काय ?
तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी आपण मतदारांच्या दारात जाऊन त्यांचे चरण स्पर्श करत होता आणि आश्वासन दिले होते आम्ही तुमचे काम करू आम्हाला मतदान करा मग तुमची आश्वासन आणि चरण स्पर्श करून केलेला वादा कुठे गेला? याचा सर्व हिशोब जनतेला दिला पाहिजे अन्यथा निमगाव केतकीतील विशेषतः वार्ड क्र.6 मधील जनता तुम्हाला माफ करणार नाही आणि याचा परिणाम आपणांस आगामी निवडणुकीत भोगावे लागणार हे त्रिवार सत्य आहे असे सचिन शिंदे यांनी सांगितले.




