माढा लोकसभा मतदारसंघातील भावी खासदारांनी तालुक्यांचा विकासनामा जाहीर करावा :- संजय (बापु) घोलप

करमाळा :- प्रतिनिधी अलीम शेख
माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना दिवसा खासदारकीचे स्वप्न पडायला लागलेत आणी पडायला पण हरकत नाही परंतू मत पाहीजे असेल तरं मतदारसंघातील जनतेसाठी काय करणार याचा विकासनामा पण निवडणुकी अगोदर जाहीर केला पाहीजे.
आज पर्यंत निवडून आलेल्या कोणत्याही खासदारांकडून ठोस कामे कुठल्याही तालुक्यात म्हणजे माढा मतदारसंघात दिसत नाही.पावर केंन्द्राची आणी काम ग्रामपंचायतीची अशी अवस्था….ठेकेदारांना मोठे करायचे काम फक्त दिसून येते विषेश म्हणजे अधिकाऱ्यांचे नातेवाईक ठेकेदार म्हणून कामं करताता आणी त्यांचेच नातेवाईक असणारे अधिकारी कामाची डोळे झाकुन बिल काढतात कसं काय होणार …बघा विचार करून असे मतदारसंघातील कामात कसा पारदर्शकपणा राहायचा…माढा लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही तालुक्यातील आमदारांनी जनतेच्या हक्काची असणारी आमसभा वारंवार संजय (बापु) घोलप मनसे तालुकाध्यक्ष करमाळा यांनी मागणी करून सुध्दा घेतली नाही.

विषेश म्हणजे विरोधात असणारे लोकप्रतिनिधींकडून देखील याची कोणतीच मागणी आजपर्यंत होताना दिसून येत नाही….हे म्हणजे कसं….सगळं मिळुन मिसळुन, चांगलय ! शहरातील ना रस्ते चांगले…ना गटारी चांगल्या…अशीच काही अवस्था तालुक्यातील प्रत्येक गावची.जनतेने याविषयी बोलायचे तरी कोणाला असा प्रश्न पडतो.
या अगोदर जे झाले ते झाले आता भावी खासदारांनी निवडणुकी अगोदर माढा लोकसभा मतदारसंघातील विकासनामा जाहीर करावा मग जनता ठरवेल मतदान कोणाला करायचे..कोणत्या भावी खासदाराची विचारांची व विकासाची किती पात्रता आहे हे पण कळेल .करमाळा तालुक्यातील व शहरातील अनेक प्रश्न वर्षा नी वर्ष प्रलंबित आहेत आजपर्यंत युवकांसाठी कोणतेही उद्योग धंदे उभारले नाही रोजगारासाठी सगळ्या युवकांना पुणे मुंबई येथे जावून काम करावे लागते..शहरातील बाजार पेठेत अनेक वर्षापासून शुकशुकाट दिसुन येतो. शहरातील अनेक व्यापाऱ्यांचा शहर सोडुन जाण्याकडे कल आहे.
विद्यार्थ्यांसाठी कोणतेही मेडिकल किंवा इंजिनिरिंग चे कसलेच काॅलेज नाही.माणूस आजारी पडला तर एखादा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही. नागरिकांना मनोरंजन साठी साधा सुस्थितीत बगीचा नाही …. नगरसेवक,आमदार,खासदार असतात कशासाठी आणि आपण मतदान कशासाठी करतो हा विचार आता करमाळा मतदारसंघांतील प्रत्येक मतदाराने भविष्यातील प्रत्येक निवडणुकीत करण्यासारखी गोष्ट आहे..
कमीत कमी शेजारील तालुके बघुन तरी लोकप्रतिनिधींनी विकासाचा विचार करावा आणि करोना काळातील न बोललेलेच बरं काय अवस्था होती जनतेची विचार केला तरी अंगावर काटा येतो….असो तरी कोण कुठुन उभारणार आणी कोण कुठुन फुटून आला कोणी कोणाला पाटींबा दिला या पेक्षा तुम्ही माढा मतदारसंघातील तालुका सुधारणेसाठी काय काय करणार यांचा विकास नामा जाहीर करा मग जनता ठरवेल कुणाला मतदान करायचे ….!



