शेगाव येथे वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन पदाधिकारी बैठक व पद नियुक्ती पत्र प्रदान सोहळा संपन्नपत्रकारितेतील 5 दशक पूर्ती निमित्त सन्मान

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
शेगाव बुलढाणा दिनांक 10/12/2023 :
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याच्या अकलूज मधील साप्ताहिक अकलूज वैभव चे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे (राष्ट्रीय सल्लागार समिती सदस्य, वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन) यांचा शेगाव (जिल्हा बुलढाणा) येथे विदर्भ विभागातर्फे जंगी सत्कार करण्यात आला. अशी माहिती वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन (WDSO) चे राष्ट्रीय समन्वयक सखाराम खोत यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितली.
“गेली 51 वर्षे पत्रकार व 38 वर्षे साप्ताहिक अकलूज वैभव चे तर पाक्षिक वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक म्हणून आजतागायत काम करीत आहेत महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये निर्भीड पत्रकार म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. गेली पाच दशके पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वच समाज घटकांसाठी अविरत काम करीत असलेले सर्व ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे हे समस्त धनगर समाजाचे एक भूषणच आहेत.” असे गौरवोद्गार याप्रसंगी वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे संस्थापक अध्यक्ष बबनराव आटोळे यांनी त्यांचा सत्कार करताना व्यक्त केले.
शासकीय विश्रामगृह शेगाव (श्री गजानन महाराजांचे) येथे संपन्न झालेल्या या सन्मान सोहळ्याप्रसंगी वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष बबनराव आटोळे बारामती, डब्ल्यू डी एस ओ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महादेव सातपुते मुंबई तसेच राष्ट्रीय समन्वयक सखारामनाना खोत इंदापूर, महासचिव अजय गाढवे पुणे, किसनराव आटोळे (सचिव ओबीसी सेल भाजप महाराष्ट्र राज्य), योगेश शिंदे यवतमाळ सौ शिंदे यवतमाळ अध्यक्षा, यांचे सह महाराष्ट्रातील 16 जिल्ह्याचे तर मध्य प्रदेशातील पाच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होऊन या व्यापक बैठक आणि पद नियुक्ती पत्र प्रदान सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी श्री गजानन महाराज यांच्या दर्शन प्रसादाचा लाभ घेतला.

4 फेब्रुवारी 2024 रोजी बारामती येथे “धनगर स्वाभिमान दिन” साजरा करण्यात येणार असून यापुढे वर्षातून एकदा हा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष बबनराव आटोळे यांनी याप्रसंगी जाहीर केले.या वेळी अनेक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना पदनियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष बबनराव आटोळे, राष्ट्रीय महासचिव प्रा.अजय गाढवे, राष्ट्रीय समन्वयक सखाराम खोत, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महादेव सातपुते, निळकंठ आटोळे (अध्यक्ष विदर्भ),विजय वामनराव गाढवे (बऱ्हाणपूर मध्यप्रदेश), धनराज आटोळे, उद्धव गावडे बारामती, सुरेश खारतोडे, राष्ट्रीय सल्लागार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, विठ्ठल गलांडे मुंबई, सतीश काळे मुंबई, संजय शिटकूने (जिल्हाध्यक्ष सातारा), शिवाजी गावडे (सल्लागार समिती), रामधन आटोळे बुलढाणा, रवींद्र गुरव (जिल्हाध्यक्ष बुलढाणा), तानाजी खोमणे, नारायण गावडे, दिलीपराव माने (धनगर समाज नेते बुलढाणा), नानाभाऊ पंरकुळे(सरपंच चिखली), ज्ञानेश्वर सांगळे, महादेव पांखुले शिराळा, संतोष आटोळे (पोलीस पाटील), सुरेश माळशिखारे (सामजिक कार्यकर्ते पाळा), सुनील गाढवे (सरपंच पाळा), सचिन ढगे (राष्ट्रीय प्रवक्ते), रामराव महाराज घोडसकर (विदर्भ सल्लागार समिती), गोपाळ तारडे खामगाव, अंबादास माने खामगाव, किसनराव आटोळे (सल्लागार समिती सदस्य, सचिव महाराष्ट्र प्रदेश भाजप), भास्कर आटोळे, शिवाजी आटोळे, संतोष आटोळे, महादेव पनखुकले, साहेबराव भदे (अध्यक्ष अमरावती), शंकरराव भदे, गजानन भदे, रमेश वरखडे, ओम प्रकाश खराटे, डॉ. संध्या शिंदे (महिला जिल्हाध्यक्ष अमरावती), राजेश खांदवे, सौ. सीमा खांदवे, पार्थ शिंदे, पवन थोटे (जिल्हाध्यक्ष यवतमाळ), श्रीराम बोरसे तसेच इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



