शहर

तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात सदाशिवराव माने विद्यालयास प्रथम क्रमांक…

अकलूज प्रतिनिधी तात्यासाहेब काटकर

वेळापूर येथील इंग्लिश स्कूल येथे पार पडलेल्या 51 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले. शालेय विज्ञान प्रदर्शने विद्यार्थ्यांसाठी त्यांचे वैज्ञानिक ज्ञान आणि सर्जनशीलता प्रदर्शित करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे. ही प्रदर्शने विद्यार्थ्यांना त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना आणि शोध लोकांसमोर मांडण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतात. अशा या स्पर्धेत इयत्ता सहावी ते आठवी गटात सिद्धनाथ ज्ञानेश्वर शिंदे याने अंध व्यक्तीसाठी चष्मा तयार केला.

त्याचा द्वितीय क्रमांक. इयत्ता नववी ते बारावी गटात प्रतीक्षा रवींद्र डोंगरे हिने फोर्स पॉवर प्रोडक्शनसाठी उत्तेजनार्थ, तर शौनक प्रदीप कुलकर्णी याने ट्रेन एक्सीडेंट प्रिव्हेन्शन मॉडेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच दिव्यांग गटात तेजस अनिल जाधव यास ऑटोमॅटिक इरिगेशन सिस्टीमला प्रथम क्रमांक आणि शैक्षणिक साहित्य निर्मिती शिक्षक गटात यास्मिन फारुक शेख मॅडम यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. प्रथम आणि द्वितीय क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची जिल्हास्तरासाठी निवड झालेली आहे.

तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींमध्ये 76 किलो वजन गटामध्ये महेश शेख हिने द्वितीय क्रमांक मिळवला तर चक्रधर महेश पावशे या विद्यार्थ्याने 97 वजन गटांमध्ये 181 किलो वजन उचलून द्वितीय क्रमांक पटकावला. अशा सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार विद्यालये मुख्याध्यापक अमोल फुले यांच्या हस्ते करण्यात आला.

सदर कार्यक्रमासाठी उप मुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य संजय शिंदे, व्यवसाय विभागाचे उपप्राचार्य विनायक रणवरे, पर्यवेक्षक उपस्थित होते. प्रदर्शनासाठी दिपाली लोखंडे, भक्ती भोईटे यांनी विज्ञान प्रदर्शन विभाग प्रमुख म्हणून कामकाज पाहिले. अशा सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन मार्गदर्शक संचालक मा. जयसिंह मोहिते पाटील, संस्था अध्यक्ष मा. संग्रामसिंह मोहिम पाटील,प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा मा. स्वरूपाराणी मोहिते पाटील, सचिव, सहसचिव, स्थानिक प्रशाला समिती सदस्य, शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button