महाराष्ट्र

होणाऱ्या 2024 माढा लोकसभा मतदारसंघा साठी मोहिते पाटील पॅटर्नच निर्णायक ठरणार ..?- अमीर मोहोळकर

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

माढा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यामधील ४ आणि सातारा जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.अशातच २००८साली अस्तित्वात आलेल्या व २००९ साली माढा लोकसभे च्या निडणुका लागल्या त्या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री राहीलेले राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भूमिके कडे अन् माढा लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार या कडे अवघ्या सोलापूर जिल्हयाचे लक्ष लागलेले होते,

त्यावेळेस देशाचे नेते राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मोहिते पाटील यांनाच उमेदवारी देतील अशी चर्चा होती,परंतू ऐन वेळी शरद पवार यांनी बारामती लोकसभेची जागा सुप्रिया सुळे यांना सोडत स्वतः च माढा लोकसभेला उभे राहिले, त्याच वेळी त्यांच्या विरोधात भाजपा ने “लोकमंगल” च्या मा सुभाष (बापू) देशमुख यांना उमेदवारी दिली या निवडणुकी चा निकाल काय असेल हे सांगण्याची कुणा ज्योतिषाची गरजच पडली नाही कारण शरद पवार हे देशाचे नेते असल्याने व सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांना भरधोस मतांनी निवडून आणण्यासाठी अख्खी “यंत्रणा” राबवत माढा लोकसभा काबीज केली आणि शरद पवार हे माढा लोकसभेचे पहिले खासदार झाले, या मध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचा सिंहाचा वाटा होता हे कुणाला वेगळे सांगायची गरज नाही…

अशातच “१४साली अख्या देशा मध्ये मोदी लाट दिसू लागली आणि २०१४ च्या माढा लोकसभेच बिगुल आणखी एकदा वाजले,अन् तत्कालीन राजकिय घडामोडी नंतर माढा लोकसभेची उमेदवारी विजयसिंह मोहिते पाटील यांना दिली,या वेळी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज भरला अख्या देशा मध्ये मोदी लाटेमुळे राष्ट्रवादी व काँग्रेस सह रथी महारथी चे बालेकिल्ले उध्वस्त झाले परंतु विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा जिंकत राष्ट्रवादी च्या झोळीत एका जागेची भर घालत माढा चे दुसरे खासदार झाले…

आपल्या खासदारकीच्या काळात अनेक योजना राबवत कुर्डूवाडी रेल्वे चा प्रश्न असो की,पंढरपूर – लोणंद रेल्वे चा प्रश्न असो,किंवा कृष्णा भीमा नदी जोड प्रकल्प असो अशा अनेक विकासात्मक कामांची उकल करत विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या खासदाकीचे 5 वर्षे अक्षरशः गाजवले…

तद्नंतर “१९च्या लोकसभेची निवडणूक येत येत अनेक राजकिय समीकरणे बदलू लागलेली,भाजपा ने पंतप्रधान “नरेंद्र मोदी” यांच्या नेतृत्वाखाली अखंड भारत अक्षरशः पिंजून काढलेला असताना अशातच राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत कुरघोडी मुळे व सतत मोहिते पाटील यांना वारंवार डावलन्यात येत असल्याने मोहिते पाटील परिवारा वर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्ते च्या प्रेमापोटी व विजयसिंह मोहिते पाटिल यांचे स्वप्न राहिलेले कृष्णा भीमा स्थिरीकरण हा प्रकल्प केंद्रात व राज्यात भाजप सरकार असल्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागू शकतो व हजारों एकर क्षेत्र ओलीताखाली येऊन शेतकऱ्यांचे भाग्य उजळणार होते,हा प्रकल्प पुर्ण करण्याचा भाजपा ने आश्वासन दिल्याने रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्या वेळी भाजप मध्ये प्रवेश करत “१९च्या माढा लोकसभा भाजप पक्षाने दिलेला उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी “किंग मेकर” ची जबाबदारी पार पाडली…

हा विषय आज घेण्याचे कारण की,माढा लोकसभा साठी आज पर्यंत 3 वेळा निवडणुक झालेली अन् प्रत्येक निवणुकीत मोहिते पाटील परिवाराचा “शब्द” प्रमाण मानत मोहिते पाटील कुठल्या पक्षात आहेत हे न पाहता सर्व सामान्य मतदार गट तट विसरून मोहिते पाटील बांधतील तेच तोरण अन् सांगतील तेच धोरण अमलात आनत जो उमेदवार ठरवतील त्याच उमेदवाराला मतदारानी मतदान रुपी आशीर्वाद दिलेले आहेत,तरी पाहूया “२४ च्या लोकसभे साठी कुजबुज चालु झालेली आहे महाराष्ट्रासह भारतीय राजकारणात अनेक उलथा पालत सुरु आहेत,या वेळी देखील मोहिते पाटील यांना विश्वासात घेत भाजप ने उमेदवार दिला तरच भाजपा हा माढा लोकसभे चा गड कायम राखू शकतो.
अन्यथा…?

वर दिलेल्या प्रश्न चिन्हाचे सविस्तर वृत्त लवकरच पुढील भागात आपल्या टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क वर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button