पालघर जिल्ह्यातील जव्हार कासटवाडी ग्रामपंचायत हद्दीत 86 लाभार्थ्यांना 10 हजार काजू कलमांचे वाटप.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत.
पालघर जिल्ह्यातील जव्हार सारख्या ग्रामीण भागात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविल्याने आमूलाग्र बदल होत आहेत.शिवाय येथील शेतकरी हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आता शेळीपालन, कुक्कुटपालन ,दुग्ध व्यवसाय करीत आहेत. असे असताना कासट वाडी ग्रामपंचायत ने एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. या भागात 10 हजार फळझाडे लागवडीतून रोजगाराची उपलब्धता व्हावी याकरिता येथील 86 लाभार्थी निवडले आहेत.
कासटवाडी ग्रामपंचायतचे सरपंच हे स्वतः शेतकरी असल्याने त्यांना शेतीबाबत चांगली माहिती आहे.येथील शेतकऱ्यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत फळझाड लागवड योजना ही कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे.विशेष म्हणजे पर्यावरणाचे संवर्धन होऊन येथील नागरिकांना रोजगारासाठी स्थलांतरीत होण्याला रोक लागेल व कुपोषण, अंधश्रद्धा निर्मूलन होण्यास मदत होईल.स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होऊन विकासाची नांदी वाढेल.

या उपक्रमातून लाभार्थ्यांना फळबाग लागवड व देखभाल करण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजने मधून पुढील 3 वर्षा साठी रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. तसेच पुढील 3 वर्षांनी फळझाडाचे उत्पन्न मिळणार आहे.या वेळी ग्रामविकास अधिकारी किशोर सोनवणे कृषी सहायक नितीन पाटील,लाभार्थी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.



