महाराष्ट्र

श्रीराम नवमी निमित्त अकलूज शहर भाजपा व जय शंकर प्रतिष्ठानच्या वतीने 160 महिला देवदर्शनसाठी रवाना

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

प्रभू श्रीराम नवमी निमित्त अकलूज शहर भारतीय जनता पार्टी व जयशंकर प्रतिष्ठान अकलूज यांच्या वतीने एक भक्तिमय उपक्रम राबविण्यात आला ज्यामध्ये पंढरपूर,तुळजापूर,अक्कलकोट,गानगापुर येथील तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी सुमारे 150 ते 160 महिलांना देवदर्शनासाठी पाठविण्यात आले. त्यामुळे महामानवांच्या आणि देव देवतांच्या जयंतीनिमित्त इतर अनाठाई खर्चास फाटा देऊन 160 महिलांना देवदर्शनाचा लाभ मिळवून दिला हे अकलूज शहर भारतीय जनता पार्टी व जय शंकर प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस.धैर्यशील मोहिते पाटील यांचे हस्ते पुजा करुन नारळ फोढून पुढील देवदर्शनासाठीच्या प्रवासासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा अल्पसंखांक मोर्चा चे जिल्हाध्यक्ष .मुखतार भाई कोरबू, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेव वावरे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे .सचिन शिंदे
भारतीय जनता पार्टी अकलूज शहर अध्यक्ष महादेव कावळे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व जोशी समाज समिती महाराष्ट्र राज्य प्रवक्ते डॉ. अक्षय वाईकर,भाजपा अकलूज शहर चिटणीस .शेखर माने व इतर सर्व मित्रपरिवार उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
06:07