खरंच करोनाचा धोका पुन्हा वाढतोय का? जाणून घ्या भारतातील करोना रुग्णांची ताजी आकडेवारी

उपसंपादक- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो .97 30 867 448
नवी दिल्ली – देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोक वर काढले आहे. एकाच दिवसात कोरोनाचे तीन हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. देशभरात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूचे ३,०१६ रुग्ण आढळले आहेत. गेल्या सहा महिन्यांतील ही सर्वाधिक रुग्ण संख्या असून गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी कोरोनाचे 3,375 रुग्ण आढळले होते.
13 हजारांहून अधिक रुग्ण ॲक्टिव
केंद्रीय आरोग्य मंत्रालायकडून सांगण्यात आले की, गेल्या 24 तासांत 1,396 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. 29 मार्च पर्यंत या ॲक्टिव रुग्णांची संख्या 11,903 होती आणि 30 मार्च रोजी एकाच दिवसात 1606 रुग्णांची वाढ होऊन 13,509 इतकी झाली आहे.
एकाच दिवसात 14 जणांचा मृत्यू
एका दिवसात 14 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 5 लाख 30 हजार 862 लोकांचा मृत्यू झाले असून आतापर्यंत देशात 4.47 कोटीहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याशिवाय एकूण 4 कोटी 41 लाख 68 हजार 321 लोक बरे झाले आहेत. यासोबतच आतापर्यंत नागरिकांना कोरोनाचे 220.65 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
कोरोना च्या वाढत्या प्रभावामुळे दिल्ली सरकारने बोलावली बैठक
देशाची राजधानी दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. वाढत्या रुग्ण संख्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दिल्ली सरकार गुरुवारी दुपारी कोविड परिस्थितीवर बैठक घेणार आहे. आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज हे आरोग्य विभागाशी संबंधित अधिकारी आणि तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करणार आहेत.