विरार येथील अल्पवयीन 14 वर्षीय मुलीवर दोघांनी केला लैंगिक अत्याचार

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.
विरार पोलीस ठाणे हद्दीतील 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी विरार पोलिसांनी या दोन जणांविरुद्ध कारवाई करून पोस्को कायद्याअंतर्गत विरार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
विरार पूर्व येथील फुलपाडा निर्मळचाळी मागील स्मशानभूमी जवळ बुधवारी ही घटना घडली आहे. विरार पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार दिगंबर येवले यांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन एका 26 वर्षीय इसमाच्या ताब्यातून या 14 वर्षाच्या मुलीची सुटका केली आहे. या मुलीची विरार पोलिसांनी अधिक चौकशी केली असता 2022 रोजी एका इसमाने तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता.
या पहिल्या इसमाने तिच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचाराला व त्याच्या जाचाला कंटाळून ही 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी 2023 रोजी पासून एका 26 वर्षीय इसमा सोबत राहत होती. परंतु या इसमाने देखील तिच्या मजबुरीचा फायदा घेऊन तिचा लैंगिक छळ करून तिच्यावर अत्याचार केला . याबाबतची माहिती विरार पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार दिगंबर येवले यांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या 26 वर्षीय इसमाला ताब्यात घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन इसमा विरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत विरार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.