सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज मधील लोकसेवक उपकार्यकारी अभियंता कास्ते व काळे यांच्या वर शिस्तभंगाची कारवाई करा – महेश शिंदे

टाइम्स 9 मराठी न्यूज
मौजे अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता कास्ते साहेब यांनी आरेतुरेची भाषा व काळे साहेब यांनी पत्र घेण्यास नाकार दिल्याने एक सामाजिक कार्यकर्ताचा अपमान केला आहे. दि 03/03/2023 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये रस्त्याच्या कामाच्या संदर्भात माहिती अधिकार अर्ज देण्यास गेले असता मी अर्जावर जन माहिती अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज असे लिहिले असता त्या ठिकाणी असणारे काळे साहेब यांनी या अर्जावर ‘कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग लिहा तरच आम्ही अर्ज घेऊ अर्ज घेणार नाही मग तुम्ही कोणालाही सांगा’ परंतु अशी कायद्यात कोणतीही तरतूद नाही
मी सांगितले व किंवा तुम्ही लेखी द्या त्यानंतर मी त्यांना नियम माहिती अधिकार अधिनियम 2005 त्याच्यामध्ये कलम 6 (3) मध्ये असे सांगण्यात आले आहे की एखाद्या विभागाला अर्ज केला असता त्याने संबंधित विभागाला पाठवायचा आहे. मी त्यांना सांगूनही काळे साहेब यांनी माझ्याशी उद्धट घालत तो अर्ज घेण्यास विलंब लावला त्यानंतर मी उपकार्यकारी अभियंता कास्ते साहेब यांना फोन लावला असता त्यांनीही तुम्हाला ‘काय अडचण आहे तुम्ही कार्यकारी अभियंता टाकून द्या तरच अर्ज घेतला जाईल व ही भाषा अरे तुरीच्या भाषेमध्ये बोलली गेली आहे’ याचे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आपल्याकडे सादर करू शकतो?
भारतीय संविधान कलम 21 नुसार आपण लोकसेवक आहे हे भान विसरून त्यांनी एक शासन दरबारी नोंदणीकृत असणारी महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या अध्यक्षां व एक सामाजिक कार्यकर्त्या बरोबर उद्धटपणाची अरे तुरेची भाषा केली आहे. त्यानंतर कायद्यात कोणती तरतूद आहे की अर्जावर संबंधित विभागाचे नाव टाकले पाहिजे असे विचारता ते काही मला माहित नाही अर्ज घेऊ शकत नाही नंतर कास्ते साहेबांनी तो अर्ज घ्यायला सांगितला व नंतर भेटायला गेल्यानंतर तिथेही त्यांनी उद्धटपणाची भाषा केली. कार्यकर्त्याच्या प्रश्नांना उत्तर देण्यास आपण बांधील नाही, माझ्यावर काय कारवाई करायची ती करा असे बोलून अपमान केला.
माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये 30 दिवसाच्या आत बंधनकारक असताना मुद्दाम त्या गोष्टींमध्ये विलंब करत आहेत.दि.13 मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने संपावर जाऊ नये म्हणून शासन निर्णय काढण्यात आलेला आहे परंतु आम्ही संपावर गेलो होतो.त्यामुळे आपला अर्ज 21,22 मार्च नंतर गणला जाईल असे सांगितले करायचा असेल तर अपील करा आम्हाला काही फरक पडत नाही.व खर्चाच्या अहवालाचे पत्र सादर पाठवताना सुद्धा मी दारिद्र रेषेत असलेला पुरावा जोडलेला असताना मला 50 पुष्टे मोफत असलेला उल्लेख जाणीवपूर्वक टाळून त्यामध्ये उल्लेख न करता पत्रास विलंब कसा लागेल या हेतूने त्यांनी मला असुधारित पत्र काढलेला आहे.त्यामुळे दिनांक 29/3/2023 ला मी पुन्हा त्यांना सुधारित पत्र काढण्यासाठी अर्ज दिला आहे अशा अनेक गोष्टींमुळे सामाजिक कार्यकर्त्याची हेंडसाळ होत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
साहेब ही लोकशाही आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला भारतीय संविधानाच्या माध्यमातून हक्क अधिकार दिलेले आहेत परंतु अशी अधिकारी माहिती लपवण्यासाठी या गोष्टी मुद्दाम घडवून आणत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूजचे उपकार्यकारी अभियंता शा.स.कास्ते व काळे साहेब यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अधीक्षक अभियंता सोलापूर यांच्या कार्यालयासमोर लोकशाही पद्धतीने बोंबाबोंब आंदोलन केले जाईल.ची दक्षता घ्यावी