महाशिवरात्रीनिमित्त व श्री महादेव देवालय देवस्थान ट्रस्ट वेळापूर च्या वतीने लक्ष बिल्वार्चन सोहळ्याचे आयोजन

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
महाशिवरात्री निमित्त व श्री महादेव देवालय देवस्थान ट्रस्ट वेळापूर च्या वतीने शिवाचार्य शिरोमणी सद्गुरु मुक्तेश्वर महाराज व सद्गुरु शिवराज महाराज यांच्या दिव्य सानिध्यात शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे पाच चे सकाळी नऊ वाजेपर्यंत लक्ष बिल्वार्चन सोहळा शंभू महादेवास रुद्राभिषेक व सायंकाळी सहा वाजता महा सत्संगाचे आयोजन करण्यात आले असल्याचे महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अमृतराज सूर्यकांत माने देशमुख यांनी सांगितले आहे
या सोहळ्यास माढा लोकसभेचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर व जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील व सौ सत्यप्रभादेवी रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी समस्त शिवभक्तानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे



