उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सचिव गौस भाई तांबोळी व त्यांच्या सहकाऱ्यांचे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश
उपसंपादक——हुसेन मुलाणी.
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.9730 867 448
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते युवासेनाप्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून.
आज दि.15/2/2023 रोजी शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उस्मानाबाद शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हासचिव तथा टायगर सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष .गौस (भाई) तांबोळी यांच्यासह त्यांचे सहकारी बाबा शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष निजाम नदाफ, मोईन तांबोळी, खाँजा कुरेशी, आसेफ तांबोळी, इम्रान तांबोळी, मोबीन तांबोळी, रणजित गोरे, आमिन तांबोळी, रेहान तांबोळी यांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी त्यांचे शिवसेना पक्षामध्ये हार्दिक स्वागत केले तसेच पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी नगराध्यक्ष नंदूभैया राजेनिंबाळकर, .नगराध्यक्ष दत्ता बंडगर, नगरसेवक प्रदिप घोणे, शिवसेना कक्ष जिल्हाप्रमुख मोईन पठाण, उपशहरप्रमुख बंडु आदरकर, युवासेना शहरप्रमुख रवि वाघमारे, अजय नाईकवाडी, पंकज पाटील, महेश देवकते, कलीम कुरेशी, साजिद शेख, शाहबाज पठाण, सत्यजित पडवळ, दिनेश बंडगर व यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, वरिष्ठ मित्र, शहरवासी, आदि उपस्थित होते.