आरोग्य
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभागात “जागरूक पालक सुदृढ बालक “या अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी संपन्न
उपसंपादक——हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.9730 867 448
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग, प्रशालेत आज “जागरुक पालक सुदृढ बालक” अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र,अकलूज च्या वतीने प्रशालेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माळशिरस तालुक्याचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे उपस्थित होते.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संकल्प जाधव सर व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका नुरजहाँ शेख उपस्थित होत्या.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती व सहकार महर्षि काकासाहेब व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित सन्माननीय प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर्स व सहकाऱ्यांचा सन्मान प्रशालेच्या मुख्याध्यापिका .शेख मॅडम यांनी केला.त्यानंतर गटविकास अधिकारी .विनायक गुळवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यांनी आपल्या मनोगतातून महाराष्ट्र शासन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या "जागरुक पालक सुदृढ बालक" या अभियानाची माहिती सांगितली.तसेच डॉ.संकल्प जाधव यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतली पाहिजे,आपल्या आरोग्याबाबत सर्वांनी जागरुक राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .प्रदीप मिसाळ यांनी केले.कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.