शहर

निमगाव( म) ता. माळशिरस येथील ग्रामपंचायत मधील लिपिक अफसर शेख यांना परत कामावर रुजू करून घेण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालय समोर उपोषण -आज 11 दिवस अकरावा दिवस

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

मौजे निमगाव ( म.) ता.माळशिरस जि. सोलापूर ग्रामपंचायती चे ग्रामविकास अधिकारी के. बी. सुरवसे यांनी वरिष्ठ अधिकाराच्या आदेशाला केराची टोपली दाखवून वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करुन ग्रामपंचायत मध्ये लिपिक पदावर रुजू करून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. तरी त्यांच्यावर तात्काळ महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा शिस्त व अपील १९६४ नुसार शिस्त भंगाची करवाई करून त्यांना तात्काळ नोकरीतून निलंबित करण्यात यावे व अफसर शेख यांना तात्काळ ग्रामपंचायत कार्यालय निमगाव मगराचे येथे कामावर रुजू करुन घेऊन त्यांना संपूर्ण निलंबित भत्ता अदा करण्यात यावा यासाठी जिल्हा परिषद सोलापूर समोर निमगाव तालुका माळशिरस येथील संपूर्ण शेख कुटुंबाचे बेमुदत उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा अकरावा दिवस आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं उपोषण दिवस रात्र असच चालू राहील असे अफसर शेख यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button