महाराष्ट्र

महाशिवरात्रीनिमित्त ‘ कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार मा. कॅबिनेट मंत्री प्राध्यापक राम शिंदे दाम्पत्याच्या ‘ हस्ते पंढरपूरमध्ये होणार विठ्ठलाला ‘गंगाजल’ महाभिषेक.

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

महाशिवरात्रीनिमित्त आमदार प्रा राम शिंदे व त्यांच्या पत्नी आशाताई शिंदे यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठ्ठलाचा ‘ गंगाजल ‘ महाभिषेक होणार आहे.

इंदौर येथील होळकर राजघराण्याकडून गेल्या २५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून देशातील १२ ज्योतिर्लिंगे आणि पंढरपुरातील विठ्ठल मुर्तीवर महाशिवरात्रीनिमित्त गंगेच्या पाण्याचा गंगाजल महाअभिषेक केला जातो. यावर्षी होणाऱ्या महाअभिषेक सोहळा आणि विठ्ठल पुजेचा मान आमदार प्रा राम शिंदे आणि त्यांच्या सौभाग्यवती आशा शिंदे यांना मिळाला आहे. येत्या शनिवारी (दि. १८) पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात हा कार्यक्रम पार पडणार आहे. अशी माहिती होळकर ट्रस्टचे पंढरपूर येथील व्यवस्थापक आदित्य फत्तेपुरकर यांनी दिली.

इंदौर येथील होळकर राजघराण्याकडून गेल्या २५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून देशातील १३ ज्योतिर्लिंगे आणि पंढरपुरातील विठ्ठल मुर्तीची महाशिवरात्रीनिमित्त महापूजा केली जाते.यासाठी इंदोर येथील होळकर ट्रस्टच्या वतीने गंगेचे उगमस्थान असलेल्या गंगोत्री येथून पवित्र गंगाजल आणले जाते. या पवित्र गंगाजलाचा १२ ज्योतिर्लिंगे आणि पंढरपूर येथील विठ्ठल मूर्तीवर महाशिवरात्रीदिवशी रात्री १२ वाजता अभिषेक करून, महापूजा केली जाते.पंढरपुर येथील विठ्ठल मूर्तीवर महाशिवरात्री दिवशी बेल वाहिले जाते. कारण विठ्ठलाच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे. विठ्ठलाला शैव वैष्णवाचं प्रतिक मानलं जातं.आषाढी एकादशीला विठ्ठलाची जशी महापूजा असते तशीच महापुजा महाशिवरात्री दिवशी केली जाते.या महापुजेसाठीचे सर्व साहित्य होळकर ट्रस्टकडून दिले जाते.

यावेळी होणाऱ्या महा अभिषेक आणि महापुजेचा मान आमदार प्रा राम शिंदे आणि त्यांच्या सौभाग्यवती आशा शिंदे यांना मिळाला आहे. इंदौरच्या होळकर ट्रस्टच्या वतीने त्यांना हा मान देण्यात आला आहे. विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासमवेत शिंदे दाम्पत्याच्या हस्ते महाअभिषेक आणि महापूजा होणार आहे, अशी माहिती होळकर ट्रस्टचे व्यवस्थापक आदित्य फत्तेपुरकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button