क्रीडा

18 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर 18 नंबरची जर्सी परिधान करणारा विराट कोहली टीम आर सी बी सह अजिंक्य…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

2008 मध्ये जेव्हा IPL सुरू झाली,तेव्हा एक तरुण,जोशात भरलेला फलंदाज मैदानावर आला. नाव – विराट कोहली.दिल्लीचा हा खेळाडू पुढे भारतीय क्रिकेटचा कणा बनणार,हे त्या दिवशी कोणालाही ठाऊक नव्हतं.त्याची ऊर्जा,आत्मविश्वास आणि खेळावरची निष्ठा वेगळीच होती.पण एक गोष्ट त्याला आयुष्यभर खटकत राहिली ती म्हणजे IPL चे विजेतेपद…

18 वर्षे – म्हणजे तब्बल एक पिढी बदलते इतका काळ.आणि या काळात विराट कोहलीने हजारो धावा केल्या,अनेक रेकॉर्ड्स मोडले,भारताला ICC ट्रॉफीज दिल्या,पण RCB ला एकदाही IPL ट्रॉफी मिळवून देता आली नाही हि खंत तो हमेशा बाळगून होता…

पण 2025 मध्ये सगळं काहीं बदललं…

3 जून 2025,नरेंद्र मोदी स्टेडियम,अहमदाबाद – RCB विरुद्ध पंजाब किंग्सचा अंतिम सामना.विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात उतरतो.डोळ्यांत जुन्या आठवणींचं दडपण,पण चेहऱ्यावर आत्मविश्वास.35 चेंडूत 43 धावांची खेळी आणि संघाला 190 धावांचा मजबूत स्कोअर.नंतर गोलंदाजांनी कमाल केली आणि 6 धावांनी सामना जिंकला…

RCB – ज्यांना नेहमी “chokers” म्हटलं जायचं,त्यांनी अखेर त्यांच्या इतिहासातली पहिली IPL ट्रॉफी जिंकलीच…

सामना संपताच विराट कोहलीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.तो क्षण केवळ RCB साठी नव्हता,तो प्रत्येक क्रिकेटप्रेमी साठी होता.कारण ह्या विजयामध्ये केवळ क्रिकेट नव्हतं,इथे होती कठोर मेहनत,सातत्य आणि हार न मानणारा आत्मा…

WEL DONE VIRAT & TEAM RCB

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button